'मॅडम सर' मालिकेत होणार मराठी कलाविश्वातील या प्रसिद्ध अभिनेत्रीची एंट्री, म्हणाली- मी अगदी...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 07:00 AM2022-09-02T07:00:00+5:302022-09-02T07:00:02+5:30

मॅडम सर ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेत आता एका मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रीची एंट्री होणार आहे.

This famous actress will take a entry in Madam Sir serial | 'मॅडम सर' मालिकेत होणार मराठी कलाविश्वातील या प्रसिद्ध अभिनेत्रीची एंट्री, म्हणाली- मी अगदी...

'मॅडम सर' मालिकेत होणार मराठी कलाविश्वातील या प्रसिद्ध अभिनेत्रीची एंट्री, म्हणाली- मी अगदी...

googlenewsNext

सोनी साबवरील मॅडम सर ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. सध्या महिला पोलिस ठाण्यात एक वेगळंच प्रकरण आलंय. एक मुलगी आपण गेल्या जन्मी नागिन असल्याचे सांगून लग्न करण्याचे टाळतं असते. हे प्रकरण आता महिला जनपथ नगर पोलिस ठाण्यात सोडवण्यासाठी आलेलं असते. अशातच मालिकेत एक मराठमोळ्या अभिनेत्रीची एंट्री होणार आहे. ती यात कॉन्‍स्‍टेबल चीताच्या आत्याचा भूमिका साकारणार आहे.

ती यात कॉन्‍स्‍टेबल चीताच्या आत्याचा भूमिका अभिनेत्री आहे शुभांगी गोखले साकारणार आहेत. मालिकेमधील त्‍यांची भूमिका महिला पोलिस ठाण्यामध्ये धुमाकूळ निर्माण करणार आहे. तिकीट कलेक्टरची पत्नी म्हणून अनेक ठिकाणी प्रवास केल्यामुळे तिला क्राइम-थ्रिलर आणि रहस्यमय कादंबऱ्यांमध्ये गुंतवून ठेवण्याची खूप आवड आहे.

‘मॅडम सर’मधील आपल्‍या भूमिकेबाबत सांगताना शुभांगी गोखले म्‍हणाल्‍या, ‘’मी अगदी बारकाईने माझे काम निवडते आणि मी पहिल्‍यांदा ‘मॅडम सर’चे कथानक ऐकले तेव्‍हा त्‍वरित कथानकाने माझे लक्ष वेधून घेतले. उत्तम लेखन असलेल्‍या मालिकेमध्‍ये काम करणे नेहमीच धमाल असते आणि या मालिकेसाठी प्रॉडक्‍शन हाऊस, दिगदर्शक व लेखकांचे अभिनंदन. माझ्या भूमिकेबाबत सांगायचे झाले तर तिला रहस्‍यमय कादंबऱ्यांची खूप आवड आहे आणि हीच आवड तिच्‍या विचारसरणीमधून देखील दिसून येते. तिची ही वृत्ती महिला पोलिस ठाण्यामध्ये केसेसचे निराकरण करण्‍यामध्‍ये लाभदायी ठरते की नाही हे येणारी वेळच सांगेल.’’ 

Web Title: This famous actress will take a entry in Madam Sir serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.