१०वी इयत्तेत ही मराठीमोळी अभिनेत्री पडली होती पाणीपुरीवाल्याच्या प्रेमात, पुढे जे घडलं ते वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 02:26 PM2023-07-10T14:26:42+5:302023-07-10T14:27:38+5:30

मराठी सिनेइंडस्ट्रीतील ही प्रसिद्ध अभिनेत्री सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत येत असते.

This Marathi actress fell in love with Panipuriwala in 10th standard, you will be shocked to read what happened next. | १०वी इयत्तेत ही मराठीमोळी अभिनेत्री पडली होती पाणीपुरीवाल्याच्या प्रेमात, पुढे जे घडलं ते वाचून व्हाल हैराण

१०वी इयत्तेत ही मराठीमोळी अभिनेत्री पडली होती पाणीपुरीवाल्याच्या प्रेमात, पुढे जे घडलं ते वाचून व्हाल हैराण

googlenewsNext

विजय केंकरे दिग्दर्शित 'डाएट लग्न' या नाटकाच्या प्रमोशनसाठी कलाकारांनी टीम 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) शोमध्ये हजेरी लावली. या नाटकात रसिका सुनील (Rasika Sunil) आणि सिद्धार्थ बोडके (Siddharth Bodke) हे मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. रसिका सुनील ही किती उत्तम गाते याचे उदाहरण चला हवा येऊ द्याच्या मंचावर पाहायला मिळाले. एक फक्कडशी लावणी गाऊन रसिकाने रसिकांची मनं जिंकून घेतली होती. याच शोमध्ये रसिकाने एक किस्सा शेअर केला. दहावी इयत्तेत असताना रसिका चक्क पाणीपुरीवाल्याच्या प्रेमात पडली होती. 

हो. तुम्ही वाचलंय ते खरं आहे. रसिकाने हा किस्सा चला हवा येऊ द्याच्या मंचावर शेअर केला होता. तो तरुण दिसायला अतिशय हँडसम असल्यामुळे रसिका सुनील त्याच्या प्रेमात पडली होती. इतकेच नाही तर त्याच्याशी लग्न करायचे म्हणून तिने आईलाच सोबत नेले होते. पण आईने तिला एक गोष्ट सांगितल्यानंतर रसिकाने त्याच्याशी लग्न करण्याचा नाद सोडून दिला. तिची आई तिला एवढंच म्हणाली की, हा पाणीपुरीवाला सकाळी लवकर उठून काम करतो. त्यानंतर तो आपलं दुकान चालवतो. तुला हे सगळं काम जमणार आहे का? आईच्या या बोलण्यानंतर मात्र रसिकाने त्याच्यासोबत लग्नाचा विषयच सोडून दिला होता. रसिकांचा किस्सा ऐकून तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना हसू आलं.

२०२१मध्ये रसिका सुनीलने बांधली लग्नगाठ

रसिका सुनील चित्रपट, मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत तिने साकारलेली शनयाची भूमिका खूप हिट झाली होती. रसिका आणि आदित्य बिलागी २०२१ मध्ये लग्नबंधनात अडकले. २०१८ मध्ये त्यांची भेट लॉस एंजिलिस येथे भेट झाली होती. बरेच वर्ष ते लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होते. २०२१ मध्ये त्यांनी गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग केले. आदित्य हा अमेरिकेतच असून रसिका कधी अमेरिका तर कधी भारतात असते.

Web Title: This Marathi actress fell in love with Panipuriwala in 10th standard, you will be shocked to read what happened next.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.