Viral Video: कोण बघतं असे शो? मालिकेतील हा ‘सीन’ बघून तुम्हालाही हसू आवरणार नाही!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 15:25 IST2022-02-01T15:24:49+5:302022-02-01T15:25:35+5:30
Thapki Pyar Ki 2 : या सीनमधील ‘सिंदूर वर्षा’ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.नेटकऱ्यांनी यावर एकापेक्षा एक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Viral Video: कोण बघतं असे शो? मालिकेतील हा ‘सीन’ बघून तुम्हालाही हसू आवरणार नाही!!
सोशल मीडियाच्या या जमान्यात कधी काय व्हायरल होईल, याचा नेम नाही. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय तो ‘थपकी प्यार की 2’ (Thapki Pyar Ki-2) या हिंदी मालिकेतील एक सीन. होय, या सीनची नेटकरी चांगलीच खिल्ली उडवत आहेत. या सीनमधील ‘सिंदूर वर्षा’ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. नेटकऱ्यांनी यावर एकापेक्षा एक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता हेच बघायचं बाकी राहिलं होतं...,अशा शब्दांत अनेकांनी मालिकेला प्रचंड ट्रोल केलं आहे.
advanced sindoor applying way in 2022 😭 pic.twitter.com/irKTLbB8yi
— rish. (@lostboyinthesky) January 27, 2022
या व्हायरल सीनमध्ये सुरुवातीला एक महिला मुद्दाम तिच्या हातातले बॅटरी सेल खाली टाकताना दिसते. या सेलवर पाय पडून एक वृद्ध महिला घसरते आणि तिचा हात बाजूलाच असलेल्या एका महिलेच्या हातातील पुजेच्या थाळीवर लागतो. त्यामुळं हे पुजेची थाळ हवेत फेकली जाते. त्यातील पुजेचं साहित्य हवेत उडतं. तिथंच उभी असलेली एक महिला आता होणार ‘सिंदूर वर्षा’असं म्हणते आणि ते ऐकून मालिकेतील मुख्य अभिनेत्री थाळीतून पडलेलं कुंकू स्वत:च्या हातात झेलते. असा हा सगळा ड्रामा पाहून प्रेक्षकांनी डोक्यावर हात मारला आहे. हे म्हणजे अति झालं, अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली.
advanced sindoor applying way in 2022 😭 pic.twitter.com/irKTLbB8yi
— rish. (@lostboyinthesky) January 27, 2022
2022 मधील कुंकू लावण्याचं अॅडव्हान्स तंत्र, अशा शब्दांत एका युजरने या सीनची खिल्ली उडवली आहे. कदाचित टीव्हीच्या मालिकावाले फिजिक्सचे सर्व नियम विसरले, अशी कमेंट एका युजरने केली आहे. काय आहे हे, कोण बघतं असे शो, कुठून येतात हे लोक? अशी कमेंट अन्य एका युजरने केली आहे. एकंदर काय तर मालिकेच्या या सीनचं चांगलंच हसं झालं आहे.