वडिलांच्या मांडीवर बसलेली ही क्युट मुलगी आज इंडस्ट्रीवर करतेय राज्य, ओळखा पाहू कोण आहे अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 11:44 AM2022-02-28T11:44:52+5:302022-02-28T12:58:36+5:30

सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटोही व्हायरल होत असतात.

this tv actress childhood photo goes viral on social media fans impressed with her style | वडिलांच्या मांडीवर बसलेली ही क्युट मुलगी आज इंडस्ट्रीवर करतेय राज्य, ओळखा पाहू कोण आहे अभिनेत्री

वडिलांच्या मांडीवर बसलेली ही क्युट मुलगी आज इंडस्ट्रीवर करतेय राज्य, ओळखा पाहू कोण आहे अभिनेत्री

googlenewsNext

टीव्ही सेलेब्सची फॅन फॉलोइंग कोणत्याही बॉलिवूड कलाकारांपेक्षा कमी नाही. बरेच चाहते सेलिब्रिटींना फॉलो करतात. सेलिब्रिटींच्या चाहत्यांना त्यांच्याबद्दल सर्व काही जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. त्यामुळे सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटोही व्हायरल होत असतात. यावेळी बिग बॉसमधून प्रसिद्ध झालेल्या शहनाज गिलचा बालपणीचा एक गोंडस फोटो व्हायरल होत आहे. शहनाज टीव्हीवरील एक क्युट अभिनेत्री आहे . पंजाबची कतरिना कैफ म्हणून सुरुवातील शहनाजची ओळख निर्माण झाली होती.

शहनाजच्या चाहत्यांनी तिच्या बालपणीचा एक फोटो शेअर केला आहे. या फॅमिली फोटोमध्ये शहनाज वडिलांच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. तिने ब्लू जीन्स आणि टर्टल नेक स्वेटर घातलेला आहे. तर दुसरीकडे शहनाजचा भाऊ शाहबाज आईच्या मांडीवर बसला आहे. हा फॅमिली फोटो व्हायरल झाला आहे.फोटोतील शहनाजच्या चेहऱ्यावरचा निरागसपणा चाहत्यांना भावला आहे.

बिग बॉसनंतर शहनाजमध्ये खूप चेंजस झाले आहेत. तिचं झालेलं ट्रान्सफोर्मेशन पाहून सगळेच थक्क झाले होते. सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शहनाजला धक्का बसला होता. आता ती स्वतःची काळजी घेत आहे आणि कामावर परतली आहे. नुकतीच ती बिग बॉस 15 च्या ग्रँड फिनालेमध्ये आली होती. जिथे त्यांनी सिद्धार्थ शुक्ला यांना श्रद्धांजली वाहिली. शहनाजने यशराज मुखातेसोबत एक गाणं शूट केलं. या गाण्यात शहनाजने स्वत:चा आवाज दिला आहे.

Web Title: this tv actress childhood photo goes viral on social media fans impressed with her style

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.