रितेश देशमुख बिग बॉस मराठी होस्ट करणार हे समजल्यावर पत्नी जिनिलियाची होती ही रिअॅक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 18:56 IST2024-07-22T18:55:40+5:302024-07-22T18:56:25+5:30
Bigg Boss Marathi 5 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी सीझन ५ ला लवकरच सुरुवात होत आहे. २८ जुलैपासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

रितेश देशमुख बिग बॉस मराठी होस्ट करणार हे समजल्यावर पत्नी जिनिलियाची होती ही रिअॅक्शन
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी सीझन ५ ला लवकरच सुरुवात होत आहे. २८ जुलैपासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदा महेश मांजरेकर यांच्या जागी सर्वांचा लाडका अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) शो होस्ट करणार आहे. तो शो होस्ट करणार हे समजल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. दरम्यान नुकतीच बिग बॉस मराठी ५ ची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी रितेशने जेव्हा या शोची ऑफर स्वीकारली त्यावेळी त्याची पत्नी जिनिलियाची रिअॅक्शन काय होती, याबद्दल सांगितले.
रितेश देशमुख म्हणाला की, जिनिलियासोबत सर्वात आधी सगळ्या गोष्टींवर चर्चा करतो. त्यांचं मत माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. आम्ही दोघे बिग बॉस बघतो. मी बिग बॉसचा फॅन आहे, हे तिलादेखील माहित आहे.
आवडता स्पर्धक
या पत्रकार परिषदेत रितेशला त्याचा बिग बॉसमधला आवडता स्पर्धक कोण होता, असे विचारण्यात आले. त्यावर तो म्हणाला की, एवढे सीझन मी पाहिले आहेत मग मराठी असो किंवा हिंदी. त्यामुळे आता सर्व सीझननंतर कोण कोणत्या सीझनमध्ये होतं यात जरा गोंधळ उडतो. पण मला शिव ठाकरे आवडतो. मराठी आणि हिंदी अशा दोन्हीमध्ये माझा तो आवडता होता.
अभिनेता रितेश देशमुखला बिग बॉस मराठी ५मध्ये सूत्रसंचालन करताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. २८ जुलैला बिग बॉस मराठी ५चा प्रीमियर होणार आहे.