'तुझ्यात जीव रंगला' मालिकेला तीन वर्ष पूर्ण, तर राणा दाने शेअर केल्या या खास गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 07:15 AM2019-07-26T07:15:00+5:302019-07-26T07:15:00+5:30
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेमुळे महाराष्ट्रातील बंद पडलेल्या अनेक कुस्ती तालीम संस्था पुन्हा उभारी घेत आहेत.
लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखांवर संबंध महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. या मालिकेचं चित्रीकरण करवीर तालुक्यातील वसगडे या गावात चालू आहे. कोल्हापूरच्या मातीशी आणि संस्कृतीशी नाळ जोडलेल्या या मालिकेला नुकतीच ३ वर्ष पूर्ण झाली आहेत. ही मालिका फक्त महाराष्ट्राच नाही तर परदेशातही लोकप्रिय आहे. मालिकेतील कुस्तीमुळे महाराष्ट्रातील बंद पडलेल्या अनेक तालीम संस्था पुन्हा उभारी घेत आहेत.
हेच मालिकेचं खरं यश आहे. अभिनेत्री अक्षया देवधर हिची ही पहिलीच मालिका असून पाठक बाई म्हणून तिने या मालिकेतून लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत रसिकांना नेहमीच सोज्वळ रुपात दिसत असते. त्यामुळे अल्पावधीतच तिने रसिकांची मनं जिंकली आहेत. तर दुसरीकडे राणा दा म्हणजेच हार्दिक जोशीनेही आपल्या अभिनयाने रसिकांची पसंती मिळवली आहे.या मालिकेतील राणा आणि अंजलीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. टीआरपी रेटिंगमध्ये पहिल्या पाच क्रमांकात याच मालिकेने बाजी मारली आहे. मालिकेच्या ती वर्षपूर्ती निमित्ताने राणा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी म्हणाला, "कोल्हापूरची संस्कृती, रांगडी भाषा, कुस्ती परंपरा, शेतकरी वारसा या मालिकेमुळे आम्हाला शिकायला मिळाले. त्यामुळे आम्ही कोल्हापूरकरच झालो आहोत."
मालिका आता एका वेगळ्या वळणावर पोहचली आहे. नुकतंच मालिकेत राजा राजगोंडाची एंट्री झालेली प्रेक्षकांनी पाहिली. राजाच्या एन्ट्रीमुळे मालिकेला एक वेगळंच रूप आलं. राणाचा राजा कसा झाला हे प्रेक्षकांना नुकतंच कळलं. राणाच्या लूकची चर्चा होते ना होते तितक्यात त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर राजाचा स्वॅग हे चॅलेंज आपल्या मित्रांना आणि सहकलाकारांना दिलं ज्यामध्ये हार्दिक राजाच्या स्टाईलने डायलॉग म्हणत आहेत, पण कलाकारच नव्हे तर त्याच्या चाहत्यांनी या चॅलेंजला जोरदार प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळतंय.
अबालवृद्ध सगळ्यांनीच राजाची स्टाईल फॉलो करत त्याच्या अंदाजात डायलॉग बोलले. राजाचा स्वॅग हा प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे. राजाला राणा म्हणून गावासमोर नंदिताने हजर जरी केलं असाल तरी राजाची स्टाईल, राजाचं बोलणं, राजाचा अंदाज हा राणापेक्षा खूपच वेगळा आहे. हीच राजाची स्टाईल प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली आहे.