म्हणून झाले देवाशप्पथ मालिकेत श्लोक आणि कुहूचे लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 10:57 AM2018-05-22T10:57:51+5:302018-05-22T16:27:51+5:30
आपण देवावर किती प्रेम करतो या पेक्षा देव आपल्यावर किती प्रेम करतो आणि मुख्य म्हणजे आजकालच्या चुकीच्या रूढी परंपरांचा ...
आ ण देवावर किती प्रेम करतो या पेक्षा देव आपल्यावर किती प्रेम करतो आणि मुख्य म्हणजे आजकालच्या चुकीच्या रूढी परंपरांचा बागुलबुवा न करता काययोग्य आणि काय अयोग्य हे दाखवण्यासाठी देवाला सुद्धा मनुष्यरूपातमानवाला त्याचा एक मित्र म्हणून भेटण्याची गरज निर्माण होत आहे,हे दाखवण्याचा एक स्तुत्य प्रयत्न 'देवाशप्पथ' या मालिकेतून केला आहे. क्रिश म्हणजे कृष्ण हा देव त्याच्या श्लोक या भक्ताला भेटायला पृथ्वीतलावर आला आहे.पण हा श्लोक मात्र देवाला मानतच नाही आणि त्या दोघांची जुगलबंदी प्रेक्षक मालिकेत अनुभवतात.सध्या मालिकेत नुकतंच लग्न झालेल्या नास्तिक श्लोक आणि भावनिक कुहू यांच्या नात्यावर भर देण्यात आलेला आहे.श्लोक व कुहू यांनी लग्न करावे अशी क्रिशची इच्छा असते पण अनेकांचा या लग्नाला विरोध असतो आणि म्हणूनचक्रिश एक युक्ती लढवतो.तो चैतन्य स्वामींना एक खोटं पत्र लिहितो ज्यात त्याने कुहू आणि श्लोक यांचं लग्न झालं असून हे दोघेही एका हॉटेल मध्ये एक दिवस एकत्र राहिले असा मजकूर लिहिला आहे.दुसऱ्यादिवशी ही बातमी वर्तमानपत्रात छापून येते.त्यांच्या विषयी पसरलेल्या या अफवांमुळे श्लोक आणि कुहू लग्न करण्याचा निर्णय घेतात.पण त्यांच्या या निर्णयाचा सर्वांना आनंद होत नाही. नंदिनी आणि आकाश आपली नाराजी देखील व्यक्त करतात.कुहूच्या वडिलांचा सुध्दा या लग्नाला पाठिंबा नसतो आणि तिच्या या निर्णयामुळे तिचे वडील तिच्याशी असलेले नाते तोडून टाकतात. त्यानंतर कुहू आणि श्लोक घरी येतात पण नाराज असलेले श्लोकचे कुटुंबिय त्यांचं स्वागत करतनाहीत. त्यानंतर ते घर सोडून क्रिशकडे राहायला जातात.कुहू आणि श्लोक कुटुंबीयांची नाराजी दूर करून सर्वांना पुन्हा एकत्र आणण्याचे ठरवतात.कुहू आणि श्लोकला कुटुंब पुन्हा एकत्र आणण्यासाठी क्रिश काही मदत करेल का? क्रिश कुहूला दशपुत्रे घरातील सुनेचा मान मिळवून देईल का? कुहू परिवारातील प्रत्येक सदस्याचे मन जिंकू शकेल का?अशा सगळ्या गोष्टींचा आगामी भागात उलगडा होणार आहे.
आज पर्यंत अनेक पौराणिक मालिका प्रेक्षकांनी पहिल्या आहेत,पण देवाशप्पथ ही आजच्या काळातील गोष्ट असून आधुनिक काळातही देव त्याच्या भक्ताशी कश्याप्रकारे जोडला आहे,श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी हे एक वेगळ्या नजरेतून प्रेक्षक अनुभवत आहेत.त्याचप्रमाणे जर देवाला आजच्या काळात खरंच पृथ्वीतलावर यायला लागलं तर काय गंम्मत घडेल हे सुद्धा या मालिकेतून पहायला मिळत आहे.'देवाशप्पथ' ही एक पूर्णपणे वेगळी संकल्पना असून या मालिकेतून आम्ही देव आणि भक्ताचे सुंदर नाते दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचे मालिकेच्या टीमचे म्हणणे आहे.