'ती फुलराणी' मालिकेत मंजूने उचललाय शिकायचा विडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 06:30 AM2019-01-20T06:30:00+5:302019-01-20T06:30:00+5:30

शिक्षण एक असे शस्त्र आहे ज्याने माणूस समृद्ध होतो, त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि आपली मते ठामपणे मांडण्याची वृत्ती विकसित होते. यासगळ्याचेच प्रात्यक्षिक सध्या सोनी मराठीवरील ‘ती फुलराणी’च्या माध्यामातून आपण अनुभवत आहोत.

Ti Phulrani Serial Updated Manjus New Task | 'ती फुलराणी' मालिकेत मंजूने उचललाय शिकायचा विडा

'ती फुलराणी' मालिकेत मंजूने उचललाय शिकायचा विडा

googlenewsNext
ठळक मुद्दे ती फुलराणी मालिकेत पाहायला मिळेल मंजूची गोष्ट

शिक्षण एक असे शस्त्र आहे ज्याने माणूस समृद्ध होतो, त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि आपली मते ठामपणे मांडण्याची वृत्ती विकसित होते. यासगळ्याचेच प्रात्यक्षिक सध्या सोनी मराठीवरील ‘ती फुलराणी’च्या माध्यामातून आपण अनुभवत आहोत. एका गरीब कुटुंबातील मुलीची शिक्षणासाठीची आवड, ते मिळवण्यासाठीचीतिची जिद्द आणि याच जिद्दीपायी आपल्या परिस्थितीवर मात करत घेतलेले शिक्षण...ही आहे ती फुलराणी मालिकेतील मंजूची गोष्ट.
 
आपल्या शिक्षणाचा खर्च सुटावा म्हणून देशमुखांच्या घरात घरकाम करणाऱ्या मंजूला, नोकरांनी शिक्षणाचे स्वप्न पाहू नये असा सल्ला या देशमुखांनी दिला होता. मात्र आपल्या शिक्षणाप्रती असलेली चिकाटी कायम ठेवत, श्रीमंतीचा माज असणाऱ्या देशमुखांना चांगलाच धडा शिकवण्याच्या उद्देशाने मंजूने शिक्षणात उत्तरोत्तर प्रगती केली आहे. शिक्षणात झालेली प्रगती तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास घेऊन आली आहे. हा आत्मविश्वास या फुलराणीच्या मोनो लॉगमधून सोशल मिडियावर सध्या चांगलाच गाजतो आहे.


 
आपल्या शिक्षणासाठी धडपडणाऱ्या मंजूवर शौनकचा जीव जडला. त्याच्याही नकळत तो तिच्यात गुंतत गेला आणि या दोन भिन्न प्रवृत्तींमधील दरी वाढत्या शिक्षणाने भरून काढली. एकमेकांच्या प्रेमात असणाऱ्या या  दोघांच्या नात्याला देशमुख परिवार स्वीकारणार की नाही? आपल्या प्रेमाखातर मंजू शौनकची सोबत सोडणार की नाते टिकवण्यासाठी देशमुखांच्या दाराचा उंबरठा ओलांडणार? यासगळ्याच प्रश्नांबरोबर देशमुखांना धडा शिकवण्यासाठी मंजू काय-काय करणार? ती फुलराणी मालिका सोनी मराठीवर पाहायला मिळेल.

Web Title: Ti Phulrani Serial Updated Manjus New Task

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.