'गुलीगत धोका' म्हणत दिवसाला इतके कमावतो सूरज चव्हाण, बिग बॉस मराठीच्या घरात केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 09:38 AM2024-07-30T09:38:10+5:302024-07-30T09:38:25+5:30

सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाणने तो दिवसाला किती पैसे कमावतो याचा खुलासा केलाय

tik tok star Suraj Chavan daily earning revealed in Bigg Boss Marathi 5 | 'गुलीगत धोका' म्हणत दिवसाला इतके कमावतो सूरज चव्हाण, बिग बॉस मराठीच्या घरात केला खुलासा

'गुलीगत धोका' म्हणत दिवसाला इतके कमावतो सूरज चव्हाण, बिग बॉस मराठीच्या घरात केला खुलासा

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये गुलीगत धोका स्टार सूरज चव्हाण सहभागी झालाय. सूरजची घरातील एन्ट्री प्रेक्षकांसाठी चर्चेचा विषय ठरली आहे. सूरज सोशल मीडिया स्टार आहे हे आपल्या सर्वांना माहितच आहे. सूरजचे व्हिडीओ इन्स्टाग्रामवर चांगलेच चर्चेत असतात. सूरज घरात हळूहळू रुळतोय. काल सूरजने एक गाणं गाऊन सर्वांची वाहवा मिळवली. अशातच सूरजने घरातील सदस्यांशी बोलताना तो दिवसाला किती कमाई करतो याचा खुलासा केलाय.

दिवसाला इतके पैसे कमावतो सूरज

सूरज चव्हाणने काल घरात योगिता चव्हाण, अभिजीत सावंत आणि घरातील इतर सदस्यांशी संवाद साधला. त्यावेळी सूरज म्हणाला, "मी दिवसाला ८० हजारांची कमाई करतो." सूरजने सांगितलेला कमाईचा आकडा बघून सर्वच शॉक झाले. अशाप्रकारे सूरज व्हिडीओ आणि यूट्यूबच्या माध्यमातून दिवसाला ८० हजार रुपये कमावतो. दरम्यान काल सूरजला घरातील सदस्यांनी एका कारणासाठी निवडलं. घरात निर्णय घेण्यास असमर्थ असलेला सदस्य म्हणून घरातील सदस्यांनी सूरजची निवड केली.


सूरज चव्हाण कोण आहे?

टिक टॉकचा पहिल्या दहात स्थान मिळवणारा स्टार अर्थात गुलीगत सूरज चव्हाण. सूरज चव्हाणचा मोठा चाहतावर्ग आहे. टिक टॉकचे रेकॉर्ड मोडणारा, अस्सल मराठी मातीतला स्टार सूरज चव्हाण आता बिग बॉस मराठीचं घर गाजवायला सज्ज आहे. सूरज चव्हाण अजून घरात थोडा गप्प गप्प दिसतोय. तो घरातील सदस्यांचं मनोरंजन करतोय. लवकरच सूरज घरातील एक अॅक्टीव्ह सदस्य होईल अशी सर्वांना आशा आहे.

Web Title: tik tok star Suraj Chavan daily earning revealed in Bigg Boss Marathi 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.