'टिकटॉक'वर व्हायरल झालेला हा रील स्टार Bigg Boss OTT 3 मध्ये करणार वाईल्ड कार्ड एन्ट्री?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 04:22 PM2024-07-11T16:22:39+5:302024-07-11T16:24:33+5:30

Bigg Boss OTT 3 मध्ये हा प्रसिद्ध टिकटॉक स्टार वाईल्ड कार्ड एन्ट्री करण्याची शक्यता आहे

TikTok star adnaan shaikh will make a wild card entry in Bigg Boss OTT 3 anil kapoor | 'टिकटॉक'वर व्हायरल झालेला हा रील स्टार Bigg Boss OTT 3 मध्ये करणार वाईल्ड कार्ड एन्ट्री?

'टिकटॉक'वर व्हायरल झालेला हा रील स्टार Bigg Boss OTT 3 मध्ये करणार वाईल्ड कार्ड एन्ट्री?

Bigg Boss OTT 3 सध्या अनेक कारणांनी गाजतंय. अनिल कपूर यांचं होस्टिंग, वडापाव गर्ल, अरमान मलिकच्या दोन पत्नी, अरमानने विशाल पांडेला लगावलेली कानाखाली, काहीच दिवसांपूर्वी घरात आढळलेला साप अशा विविध कारणांमुळे Bigg Boss OTT 3 ची चांगलीच चर्चा रंगतेय. आतापर्यंत घरातून नीरज गोयत, पॉलमी दास, पायल मलिक आणि मुनिषा खतवानी बाहेर पडले आहेत. अशातच टिकटॉकवर नाव कमावलेला प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार Bigg Boss OTT 3 मध्ये दाखल होणार आहे.

Bigg Boss OTT 3 येणार हा प्रसिद्धा रील स्टार

प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार अदनान शेख बिग बॉस ओटीटी 3 च्या घरात वाईल्ड कार्ड प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. बिग बॉस ओटीटीशी संबंधित जे फॅन पेज आहेत त्यांनी याविषयी संबंधित अपडेट दिले आहेत. अदनान शेख हा घरातील पहिला वाईल्ड कार्ड स्पर्धक असेल. अदनानचे सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोअर्स आहेत. अदनानला इंस्टाग्रामवर ११. ३ मिलियन लोक फॉलो करतात. टिकटॉकच्या माध्यमातून अदनान आणि त्याच्या ग्रुपने भरपूर लोकप्रियता मिळवली. आता इंन्स्टाग्रामवर रीलच्या माध्यमातून अदनान आणि त्याचा ग्रुप चर्चेत आहे.

कोण आहे अदनान शेख?

अदनान शेख हा मुंबईत राहणारा आहे. सोशल मीडियाच्या जगात तो खूप लोकप्रिय आहे. अदनान शेखने आतापर्यंत अनेक स्टार्ससोबत काम केले आहे. त्याने एका जाहिरातीमध्ये सुपरस्टार अक्षय कुमारसोबतही काम केलं आहे. या जाहिरातीमुळे त्याला मनोरंजन क्षेत्रात बरीच ओळख मिळाली. अदनान आत्तापर्यंत अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसला आहे. 'बदनाम', 'नजर ना लग जाए' आणि 'डायमंड रिंग'सह त्याचे अनेक म्यूझिक अल्बम आणि व्हिडीओ लोकप्रिय आहेत. अदनानला 'बिग बॉस ओटीटी ३' मध्ये बघायला त्याचे फॅन्स उत्सुक आहेत.

Web Title: TikTok star adnaan shaikh will make a wild card entry in Bigg Boss OTT 3 anil kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.