आता तर हद्दच झाली! अभिनेत्रीने चक्क मासळी बाजारात केले फोटोशूट; युजर्स म्हणाले, बोंबिल कसे दिले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 17:43 IST2021-08-10T17:40:53+5:302021-08-10T17:43:16+5:30

याआधी या अभिनेत्रीनेने चक्क भाजीपाल्याच्या ठेल्यावर असेच एक फोटोशूट केले होते. तिच्या या फोटोवरूनही युजर्सनी तिची मजा घेतली होती.

Tina Dutta selling fishes in fish market, photos viral | आता तर हद्दच झाली! अभिनेत्रीने चक्क मासळी बाजारात केले फोटोशूट; युजर्स म्हणाले, बोंबिल कसे दिले?

आता तर हद्दच झाली! अभिनेत्रीने चक्क मासळी बाजारात केले फोटोशूट; युजर्स म्हणाले, बोंबिल कसे दिले?

ठळक मुद्देका टॉपलेस फोटोमुळे टिना चांगलीच चर्चेत आली होती. या टॉपलेस फोटो वरून अनेक सोशल मीडिया युजर्सनी तिला ट्रोल केले होते.

उतरन  या मालिकेतील इच्छा तुम्हाला आठवत असेलच. होय, अभिनेत्री टिना दत्ताने  (Tina Dutta) ही भूमिका साकारली होती. टिनाची ही भूमिका चांगलीच गाजली होती. या मालिकेनंतर टिनाने अनेक मालिकांत काम केले. पण सध्या टिना मालिकेमुळे कमी अन् सोशल मीडियावरच्या फोटोंमुळे चर्चेत असते. स्वत:चे ग्लॅमरस व बोल्ड फोटो ती शेअर करत असते. याचदरम्यान टिनाने असे काही फोटो शेअर केले की, तो पाहून चाहतेही थक्क झालेत. होय, या फोटोत टिना चक्क मासे विकताना दिसतेय.

टिनाने तीन फोटो शेअर केले आहेत. यात ती मासळी बाजारात मासे विकताना दिसतेय. आता यावरून टिना नेहमीप्रमाणे ट्रोल होतेय, हे सांगायला नकोच. नेटक-यांनी तिची चांगलीच मजा घेतलीये.
 बोंबिल कसे दिले, असा मजेशीर प्रश्न एका चाहत्याने केला आहे. अन्य एका युजरने तिचा हा फोटो पाहून ‘मच्छा मार्केट’ अशी कमेंट केली आहे. हे फोटो टिनाच्या एका नव्या प्रोजेक्टचे असल्याचे तूर्तास वाटतेय. अर्थात तिच्या या नव्या प्रोजेक्टचा खुलासा अद्याप व्हायचाय.

याआधी टिनाने चक्क भाजीपाल्याच्या ठेल्यावर असेच एक फोटोशूट केले होते. तिच्या या फोटोवरूनही युजर्सनी टिनाची मजा घेतली होती.
 सब्जीवाली बाई आ गई, सब्जी लेलो मोहल्लेवालों, असे म्हणत एका युजरने तिची खिल्ली उडवली होती.  अन्य एका युजरने ‘मॅडम टोमॅटो कसे दिलेत?’, असा सवाल करत ट्रोल केले.  एका टॉपलेस फोटोमुळे टिना चांगलीच चर्चेत आली होती. या टॉपलेस फोटो वरून अनेक सोशल मीडिया युजर्सनी तिला ट्रोल केले होते. या ट्रोलिंगला कंटाळून टिनाने कमेंट सेशन बंदही केले होते.

Web Title: Tina Dutta selling fishes in fish market, photos viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.