टिना दत्ता झळकणार एकता कपूरच्या मालिकेत, ही असणार भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 15:39 IST2018-11-28T15:38:01+5:302018-11-28T15:39:07+5:30
एकता कपूरच्या नव्या 'डायन' या कार्यक्रमात भूमिका मिळवली आहे. या मालिकेच्या निमित्ताने टिना पहिल्यांदाच रोमान्स प्रकारापासून दूर जात बालाजी टेलिफिल्म्सच्या या नव्या भय आणि गूढकथेत दिसणार आहे.

टिना दत्ता झळकणार एकता कपूरच्या मालिकेत, ही असणार भूमिका
'उतरन' मालिकेमुळे घराघरात पोहचलेली इच्छा अर्थात टीना दत्ता आता लवकरच छोट्या पडद्यावर कमबॅक करते. उतरन या मालिकेमुळेच ती ख-या अर्थाने प्रकाझोतात आली. इतकेच नाही तर आजही टीना दत्ताला इच्छा याच नावाने ओळखले जाते.उतरन मालिकेनंतर ती विविध कार्यक्रमांतून आपल्या चाहत्यांच्या भेटीला आली. मात्र मालिकेतून ती जास्त छोट्या पडद्यावर झळकलीच नाही. आता ती मालिकेतून रसिकांच्या भेटीला येत आह. एकता कपूरच्या नव्या 'डायन' या कार्यक्रमात भूमिका मिळवली आहे. या मालिकेच्या निमित्ताने टिना पहिल्यांदाच रोमान्स प्रकारापासून दूर जात बालाजी टेलिफिल्म्सच्या या नव्या भय आणि गूढकथेत दिसणार आहे.
टिना जान्हवी मोर्य या तरुणीची भूमिका साकारतेय. उज्जैनमधील सुशिक्षित आणि कौटुंबिक विचारांची ही २२ वर्षीय तरुणी नवी दिल्लीत उच्च शिक्षणासाठी आली आहे. बालपणी तिच्यासोबत घडलेल्या काही सुपरनॅचरल घटनांमुळे या गूढ जगावर तिचा पक्का विश्वास आहे. दुष्ट शक्तींनी मांडलेल्या धोकादायक खेळात, तिच्या मूळ घरी अत्यंत असामान्य आणि गूढ घटना घडत असताना सरत्या वेळेशी ती कसा सामना करते. हा प्रवास 'डायन'मधून प्रेक्षकांपुढे मांडला जाणार आहे. तिच्या जवळच्या व्यक्तींमध्येच लपलेल्या डायनला शोधणे आणि या दुष्ट शक्तीचा पराभव करण्याचा हा तिचा प्रवास आहे.
या नव्या मालिकेचा भाग असण्याबाबत आणि ही भूमिका साकारण्याबद्दल टिना म्हणाली, "मी याआधी जे काही केले आहे त्यापेक्षा वेगळे आणि मला एक नवे आव्हान देणा-या मालिकेच्या मी शोधात होते. शिवाय, आपली अनोखी संकल्पना आणि पटकथा यामुळे ही मालिका ठरलेले साचे मोडेल. हे गूढ उकलण्याच्या प्रवासात माझी व्यक्तिरेखा, जान्हवीला ज्या आव्हानांचा सामना करावा लागतो, ते पाहून प्रेक्षकही तिला साथ देतील. एकता कपूर यांच्या कामाने कलाकारांना नेहमीच प्रेरणा मिळते. त्यांच्या कथा आणि त्यांचे सादरीकरण यांनी प्रेक्षकांवर नेहमीच छाप पाडली आहे. त्यांच्यासोबत ही माझी दुसरी मालिका आहे. पुन्हा एकदा बालाजी टेलिफिल्म्ससोबत आणि &TV सोबत नव्याने प्रवास सुरू करताना मला आनंद होत आहे."