तितिक्षा तावडे - सिद्धार्थ बोडकेचा साखरपुडा संपन्न, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 16:06 IST2024-02-25T16:04:00+5:302024-02-25T16:06:17+5:30
प्रथमेश परबच्या लग्नानंतर आता मराठमोळी सेलिब्रिटी जोडी तितिक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडकेच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल झाले आहेत (Titeekshaa Tawde, siddharth bodke)

तितिक्षा तावडे - सिद्धार्थ बोडकेचा साखरपुडा संपन्न, फोटो व्हायरल
गेल्या अनेक दिवसांपासून मराठी मनोरंजन विश्वात विविध सेलिब्रिटींची लगीनघाई सुरु आहे. नुकतंच प्रथमेश परबने गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकरसोबत लग्न केलं. तर अभिनेत्री पूजा सावंतनेही काहीच दिवसांपूर्वी साखरपुडा केला. अशातच मराठमोळी अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके यांचा साखरपुडा झाल्याची बातमी समोर येतेय.
तितिक्षा तावडे - सिद्धार्थ बोडके गेल्या अनेक दिवसांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. काहीच दिवसांपुर्वी त्यांनी त्यांच्या नात्याचा जाहीर खुलासा केला. आज रविवारी २५ फेब्रुवारीला तितिक्षा - सिद्धार्थने साखरपुडा केला. या दोघांच्या साखरपुड्याला त्यांचे कुटुंबिय आणि मनोरंजन विश्वातील त्यांचे मित्र - मैत्रीणी उपस्थित होते. या दोघांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
साखरपुड्याची खास अंगठी दाखवत तितिक्षा - सिद्धार्थचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तितिक्षा - सिद्धार्थ गेल्या अनेक दिवसांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. तितिक्षा सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत झळकत आहे. तर सिद्धार्थला आपण अनेक मालिका, नाटक, वेबसिरीजमधून पाहिलंय. सिद्धार्थने अजय देवगणच्या 'दृश्यम 2' मध्येही अभिनय केलाय.