"माझ्या आयुष्यातील प्रेमाला...", अजिंक्य ननावरेची पत्नी शिवानी सुर्वेच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 12:53 PM2024-08-28T12:53:12+5:302024-08-28T12:54:10+5:30

Ajinkya Nanaware And Shivani Surve : अभिनेत्री शिवानी सुर्वे हिचा आज वाढदिवस असून या निमित्ताने तिचा नवरा अजिंक्य ननावरेने खास पोस्ट शेअर केली आहे.

"To the love of my life...", Ajinkya Nanaware's wife Shivani Surve's special birthday post | "माझ्या आयुष्यातील प्रेमाला...", अजिंक्य ननावरेची पत्नी शिवानी सुर्वेच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

"माझ्या आयुष्यातील प्रेमाला...", अजिंक्य ननावरेची पत्नी शिवानी सुर्वेच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडीपैकी एक जोडी म्हणजे शिवानी सुर्वे (Shivani Surve) आणि अजिंक्य ननावरे (Ajinkya Nanaware). शिवानी आणि अजिंक्य बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. १ फेब्रुवारी रोजी शिवानी आणि अजिंक्य लग्नबेडीत अडकले. त्यांच्या लग्नसोहळ्यातील अनेक फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ही जोडी बऱ्याचदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असते. आज अभिनेत्री शिवानी सुर्वे हिचा वाढदिवस असून या निमित्ताने तिचा नवरा अजिंक्य ननावरेने खास पोस्ट शेअर केली आहे.

अजिंक्य ननावरेने शिवानी सोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि लिहिले की, माझ्या आयुष्यातील प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! हा दिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी मी जास्त उत्साही होऊ शकत नाही. माझी सुंदर पत्नी, तुला शुभेच्छा! कायम असेच एकत्र सेलिब्रेशन करूयात. अजिंक्यच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे. ते या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. यावर शिवानीनेदेखील कमेंट केली आहे. तिने आहो आभारी आहे असे लिहिले आहे.


वर्कफ्रंट
सध्या अजिंक्य ननावरे झी मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. या मालिकेत तो अद्वैत ही भूमिका बजावत आहे. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे. तर शिवानी सुर्वे स्टार प्रवाह वाहिनीवरील थोडं तुझं थोडं माझं या मालिकेत काम करताना दिसते आहे. यात तिने साकारलेल्या मानसीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळताना दिसत आहे.

Web Title: "To the love of my life...", Ajinkya Nanaware's wife Shivani Surve's special birthday post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.