'खूप लवकर गेलास रे...', 'रंग माझा वेगळा'मधील श्वेतावर कोसळला दुःखाचा डोंगर; गमावला जवळचा व्यक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 09:55 AM2022-05-11T09:55:10+5:302022-05-11T09:55:38+5:30
Rang Maza Vegla: 'रंग माझा वेगळा' मालिकेत श्वेताची भूमिका अभिनेत्री अनघा भगरे (Anagha Bhagare) हिने साकारली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून जवळचा व्यक्ती गमावल्याचे सांगितले.
स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla) सध्या रंजक वळणावर आली आहे. या मालिकेतील कथानक आणि त्यातील पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते आहे. या मालिकेत श्वेताची भूमिका अभिनेत्री अनघा भगरे (Anagha Bhagare) हिने साकारली आहे. दरम्यान, अनघा भगरेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून जवळचा व्यक्ती गमावल्याचे सांगितले. तिच्या काकांचे नुकतेच निधन झाले आहे.
अनघा भगरे हिने इंस्टाग्रामवर काकांसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, भैय्या काका... ९/५/२०२२ खूप लवकर गेलास रे. तू काका नाही मित्र होतास माझा. आपल्या खूप पार्टीज पेण्डिंग आहेत. 'अॅना, मला मुलगी नाही त्यामुळे तुझ कन्यादान मीच करणार' हे सतत सांगायचास. स्वतःच्या मुलीसारखाच मला खूप प्रेम दिलेस.
तिने पुढे म्हटले की, नेहमी भेटलो की वरण तूप पोळीचा बेत करायचो. कारण काका पूतणीची आवड अगदी सेम. स्वतःच्या आनंदासोबातच स्वतःची दुःख अगदी मोकळेपणाने शेअर करायचास. तू शिकवलस नेहमी आनंदी कस रहायच. काहीही झाले तरी ग्राउंडेड रहायचे. मोठयांचा आदर करायचा. मला तुझी खूप आठवण येते.
अनघा अतुल भगरे ही भगरे गुरुजींची लेक आहे. अनघाची आई मोहिनी भगरे या शिक्षिका आहेत. 'रंग माझा वेगळा' ही तिची पहिलीच टीव्ही मालिका असून तिने 'अनन्या' या लोकप्रिय नाटकातही काम केले आहे. अनघाचे शालेय शिक्षण नाशिकमध्ये झाले. त्यानंतर एसएनडीटी कॉलेज मुंबई येथून तिने मास कम्युनिकेशनची पदवी मिळवली. 'कुलकर्णी व्हर्सेस कुलकर्णी' आणि 'व्हाट्सएप लग्न' या चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून तिने काम सांभाळले होते. याशिवाय काही काळ 'कोठारे व्हिजन'मध्ये पीआर ब्रँड मॅनेजर म्हणूनही तिने काम केले.