TRPच्या शर्यतीत कोणती मालिका ठरली नंबर 1 ? तुमची आवडती मालिका कोणत्या स्थानावर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 17:56 IST2022-08-05T17:56:20+5:302022-08-05T17:56:58+5:30
Marathi Serial TRP List : ‘आई कुठे काय करते’ला मागे टाकत ‘हा’ शो ठरला नंबर 1, पाहा यादी...

TRPच्या शर्यतीत कोणती मालिका ठरली नंबर 1 ? तुमची आवडती मालिका कोणत्या स्थानावर?
Marathi Serial TRP List : सध्या अनेक मराठी मालिका चर्चेत आहेत. यापैकी कोणती मालिका नंबर 1 वर आहे, टीआरपीच्या शर्यतीत कोणत्या मालिकांनी बाजी मारलीये, हे जाणून घेण्यास उत्सुक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. दर आठवड्याला प्रेक्षकांचा कल बदलतो आणि त्यानुसार टीआरपीचं रेटिंग ठरतं.
10. सुरूवात करू या टॉप 10 पासून. तर सध्या दहाव्या स्थानावर आहे ती स्टार प्रवाह वाहिनीवरची ‘सहकुटुंब सहपरिवार’ही मालिका.
9. झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका येत्या काही दिवसांत संपणार आहे. पण त्याआधी या मालिकेनं टीआरपी चार्टवर नववं स्थान पटकावलं आहे.
8. ‘स्वाभिमान-शोध अस्तित्वाचा’ ही मालिका सध्या आठव्या स्थानावर आली आहे.
7. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या झी मराठीवर प्रसारित होणारी मालिका या आठवड्या सातव्या क्रमांकावर आहे.
6. ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सहाव्या क्रमांकावर आहे.
5. स्टार प्रवाह वाहिनीवरची ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका पाचव्या स्थानावर आहे.
4. स्टार प्रवाह वाहिनीवरचीच ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका टीआरपी चार्टवर चौथ्या क्रमांकावर आहे.
3. अरूंधती, अनिरूद्धची ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने या आठवड्यात टीआरपीच्या शर्यतीत तिसरं स्थान मिळवलं आहे.
2. स्टार प्रवाह वाहिनीवरची ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका टीआरपी रेसमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.
1. आता पहिल्या क्रमांकावर कोणती मालिका आहे तर गेल्या काही आठवड्यांपासून अव्वल स्थानावर असलेल्या ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका पुन्हा एकदा नंबर 1 वर आहे. या मालिकेला 6.7 रेटिंग मिळालं आहे.