तृतीयपंथी मराठी अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, म्हणाली "गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 11:44 IST2025-02-02T11:44:02+5:302025-02-02T11:44:11+5:30

तृतीयपंथी अभिनेत्रीचा लग्न सोहळा पार पडला आहे.

Transgender Marathi Actress Pranit Hatte Got Married See Wedding Photos | तृतीयपंथी मराठी अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, म्हणाली "गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने..."

तृतीयपंथी मराठी अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, म्हणाली "गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने..."

Pranit Hatte: सध्या लग्न सराई सुरू आहे. सर्वसामान्य व्यक्तींसोबतच अनेक सेलिब्रिटी मंडळी देखील विवाह बंधनात अडकताना पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री शिवानी सोनार आणि अंबर गणपुळे यांच्यानंतर आणखी एका मराठी सेलिब्रेटीनं लग्न केलं आहे. काल शनिवारी १ फेब्रुवारीच्या मुहूर्तावर तृतीयपंथी मराठी अभिनेत्री प्रणित हाटेने (Pranit Hatte Wedding) लग्नगाठ बांधली. 

 प्रणित हाटेने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली. "गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने एक नवीन सुरुवात...", असं कॅप्शन देत प्रणितने लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. प्रणितने लग्नात पारंपारिक मराठी लूक केलेला पाहायला मिळाला. लाल रंगाची साडी, हिरव्या रंगाचा चुडा असा लूक होता. तर पतीनं पांढरा कुर्ता-पायजामा व लाल जॅकेट असा पोशाख परिधान केलेला.



प्रणित हाटेनं कलाविश्वात तिचं असं स्थान निर्माण केलं आहे. कलेला कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं, हे सिद्ध करुन दाखवलं. मराठी सिनेसृष्टीतील पहिली ट्रान्सजेंडर अभिनेत्री अशी तिची आता ओळख आहे. झी युवा वाहिनीवर आलेल्या युवा डान्सिंग क्वीन या कार्यक्रमातून प्रणित घराघरात पोहचली. या कार्यक्रमातून ती गंगा म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तसेच 'कारभारी लयभारी' मालिकेतून प्रणितने काम केलं आहे. 

Web Title: Transgender Marathi Actress Pranit Hatte Got Married See Wedding Photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.