​मालिकामध्ये परदेशगमनाचा ट्रेंड !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2016 04:00 PM2016-10-15T16:00:08+5:302016-10-15T16:07:55+5:30

सध्याचा जमाना टीआरपीचा आहे.त्यामुळे रसिक आपल्याच चॅनलवर खिळून राहावा यासाठी टीव्ही चॅनल्सकडून एकाहून एक भन्नाट कल्पना लढवल्या जात आहेत.रिअॅलिटी ...

Tremendous trends in the series! | ​मालिकामध्ये परदेशगमनाचा ट्रेंड !

​मालिकामध्ये परदेशगमनाचा ट्रेंड !

googlenewsNext
्याचा जमाना टीआरपीचा आहे.त्यामुळे रसिक आपल्याच चॅनलवर खिळून राहावा यासाठी टीव्ही चॅनल्सकडून एकाहून एक भन्नाट कल्पना लढवल्या जात आहेत.रिअॅलिटी शोमध्ये रसिकांचे आवडते स्पर्धक आणण्याची शक्कल चॅनेलवाल्यांनी लढवलीय.त्यातच वाढते चॅनल्स,वाढती स्पर्धा यामुळे मालिकांनाही आपल्या टीआरपीवर बरेच लक्ष ठेवावे लागत आहे.मालिकांमधील व्यक्तीरेखांचे कपडे,दागिने,घरं सारं काही भव्यदिव्य दाखवून रसिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न मध्यंतरी झाला.आता तर इतके भव्यदिव्य दाखवूनही रसिक चॅनलला खिळून राहत नसल्याने मालिका निर्मात्यांना परदेशवारीची नवी आयडियाची कल्पना शोधावी लागली आहे. त्यामुळं गेल्या काही वर्षात मालिकांमध्ये परदेशगमनाचा नवा ट्रेंड पाहायला मिळतोय. 

परदेश सिक्वेन्स दाखवण्यासाठी मालिकांमध्ये एकाहून एक ट्विस्ट आणि धक्कातंत्र निर्मात्यांकडून अवलंबले जाऊ लागले.परदेशातल्या ऑफिस मिटींग, सहली,हनीमून असे सिक्वेन्स मालिकांमध्ये टाकण्याचा नवा फंडा मालिका निर्मात्यांनी सुरु केला. याची पहिली झलक पाहायला मिळाली ती रसिकांची छोट्या पडद्यावरील आवडती मालिका 'क्योंकी साँस भी कभी बहू थीं' या मालिकेत. कथानकाची गरज आणि रसिकांना आकर्षित करण्यासाठी या मालिकेचे शुटिंग ऑस्ट्रेलियात करण्यात आले होते. 'बडे अच्छे लगते है' या मालिकेतील प्रिया आणि राम हनीमूनसाठी ऑस्ट्रेलियातच गेल्याचे दाखवण्यात आले होते. 'साथ निभाना साथियाँ' या मालिकेच्या काही भागांचे शुटिंग स्वित्झर्लंडमध्ये करण्यात आले.या मालिकेत एहेम आणि त्याचा भाऊ जिगर परदेशात नवा प्रोजेक्ट सुरु करणार असल्याच्या निमित्ताने परदेशात गेल्याचे दाखवण्यात आले होते.

रसिकांची आणखी एक आवडती मालिका म्हणजे 'ससुराल सिमर का'.या मालिकेचं शुटिंग हाँगकाँगमध्ये झाले होते. त्यासाठी मालिकेची सगळी टीम हाँगकाँगला गेली होती. 'दिया और बाती हम' या मालिकेच्या काही भागाचे शुटिंग सिंगापूरमध्ये करण्यात आले. याच ठिकाणी संध्या सूरजबद्दल असलेलं प्रेम व्यक्त करते आणि तिथेच त्यांचे प्रेम बहरते असा सीन या मालिकेत दाखवण्यात आला होता. 'ये है मोहब्बते' या आणखी एका मालिकेचे शुटिंग परदेशात करण्यात आले.पॅरिसमधल्या निसर्गरम्य आणि रोमँटिक जागी या मालिकेचं शुटिंग पार पडले.नुकतेच 'परदेस में है मेरा दिल' या मालिकेचे शुटिंगही ऑस्ट्रियात सुरु आहे. नागिन फेम अर्जुन बिजलानी या मालिकेत असून तो एका एनआरआयच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 

याशिवाय 'हिटलर दीदी' मालिकेचं शुटिंग मकाऊमध्ये, 'सीआयडीचे' पॅरिस,'बडी देवरानी' मालिकेचे मकाऊमध्ये, 'तू मेरा हिरो' या मालिकेचे शुटिंग न्यू जर्सीत आणि 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचं शुटिंग डिस्नीलँड झाले असल्याचे पाहायला मिळालं.परदेशात शुटिंग करण्यात आलेल्या या मालिकांना रसिकांचाही चांगला प्रतिसाद मिळतोय. परदेशातील आकर्षक ठिकाणं,निसर्गसौंदर्याचा आनंद घरबसल्या घेता येत असल्याने रसिकांनाही ही परदेशातल्या मालिका शुटिंगची आयडियाची कल्पना चांगलीच भावतेय.

Web Title: Tremendous trends in the series!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.