टीआरपीच्या रेसमध्ये 'आई कुठे काय करते' राहिली मागे, या मालिकेने पटकावले अव्वल स्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 12:35 PM2021-06-16T12:35:39+5:302021-06-16T12:36:08+5:30

या आठवड्यातील टॉप ५ मराठी मालिकांबद्दल जाणून घ्या

In the TRP race, 'Where does mother do what?', The series topped the list | टीआरपीच्या रेसमध्ये 'आई कुठे काय करते' राहिली मागे, या मालिकेने पटकावले अव्वल स्थान

टीआरपीच्या रेसमध्ये 'आई कुठे काय करते' राहिली मागे, या मालिकेने पटकावले अव्वल स्थान

googlenewsNext

मालिकांच्या टीआरपीवरून मालिकेची लोकप्रियता ठरते. सातत्याने टीआरपीच्या रेसमध्ये अव्वल असणाऱ्या आई कुठे काय करते मालिकेचा टॉप ५च्या यादीत समावेश नाही. तसेच या रेसमधून येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिकादेखील बाहेर पडली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून देवमाणूस मालिका टीआरपीच्या रेसमध्ये अव्वल होती, मात्र आता देवमाणूसला मागे टाकत 'मुलगी झाली हो' या मालिकेने पहिल्या क्रमांकावर बाजी मारली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मराठी मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट आणि टर्न्स पाहायला मिळत आहेत. प्रत्येक मालिका टीआरपीच्या स्पर्धेत अव्वल ठरण्यासाठी प्रयत्न करत असतात. दरम्यान आता आई कुठे काय करते, येऊ कशी तशी मी नांदायला आणि देवमाणूस या मालिकांना मागे टाकत 'मुलगी झाली हो' ही मालिका अव्वल ठरली आहे.

दुसऱ्या क्रमांकावर 'सुख म्हणजे नक्की काय असतं?' ही मालिका आहे. तर, तिसऱ्या क्रमांकावर 'रंग माझा वेगळा' ही मालिका आहे.


काही आठवड्यांपूर्वी पहिल्या क्रमांकावर असलेली देवमाणूस मालिका टीआरपीच्या शर्यतीत मागे पडली आहे. ही मालिका चौथ्या स्थानावर आहे.

पाचव्या क्रमांकावर 'फुलाला सुगंध मातीचा' ही मालिका आहे. अग्गंबाई, सुनबाई, येऊ कशी तशी मी नांदायला, सांग तू आहेस ना? आई कुठे काय करते? या मालिका टीआरपीच्या शर्यतीतून बाहेर पडल्या आहेत.

Web Title: In the TRP race, 'Where does mother do what?', The series topped the list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.