सिंपल पण तितकीच मनमोहक; अश्विनीने केलं सौंदर्य खुलवणारं फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 17:55 IST2023-03-14T17:55:14+5:302023-03-14T17:55:50+5:30
Deepa chaudhari: अश्विनी म्हणजेच दिपा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून ती वरचेवर चाहत्यांसाठी काही पोस्ट शेअर करत असते.

सिंपल पण तितकीच मनमोहक; अश्विनीने केलं सौंदर्य खुलवणारं फोटोशूट
छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे 'तू चाल पुढे' ( tu chal pudha) या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री दिपा परब-चौधरी (deepa parab-chaudhari) हिने बऱ्याच वर्षांनंतर कलाविश्वात कमबॅक केलं. विशेष म्हणजे ती साकारत असलेल्या अश्विनी या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळत आहे. त्यामुळेच तिच्या लोकप्रियतेतही झपाट्याने वाढ झाल्याचं दिसून येतं.
अश्विनी म्हणजेच दिपा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून ती वरचेवर चाहत्यांसाठी काही पोस्ट शेअर करत असते. अलिकडेच दिपाने एक फोटोशूट केलं आहे. यातील निवडक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दिपाने निळ्या रंगाची साडी नेसली असून तिच्यातील साधेपणा नेटकऱ्यांना खुणावत आहे.
दरम्यान, अश्विनीने जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी हे फोटो शेअर केले होते. यावेळी तिने निळ्या रंगाची बांधणीची साडी नेसली होती. सोबतच तिने केस मोकळे सोडले होते. दिपा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने मराठीसह हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. यात 'थोडी ख़ुशी थोडा गम', 'छोटी मॉ', 'मित' आणि 'रेत' तिच्या काही हिंदी मालिका गाजल्या आहेत.