Tu Chal Pudha: तू चाल पुढं' मालिकेत येणार नवं वळण, अश्विनीच्या वादिवसादिवशी श्रेयस शिल्पीला माफ करेल का?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 12:43 PM2023-08-03T12:43:41+5:302023-08-03T12:46:48+5:30
शिल्पीचे आतापर्यंतचं सगळेच डाव तिच्यावर उलटले. अश्विनीला त्रास देण्यासाठी शिल्पीने विद्युतसोबतचा आपला हसता खेळता संसार देखील मोडला.
भिनेत्री दीपा परब हिने जवळपास १४ वर्षानंतर पुन्हा एकदा 'तू चाल पुढं' या मालिकेतून मराठीत कमबॅक केलं. या मालिकेची गोष्ट आहे एका गृहिणीने पाहिलेल्या मोठ्या स्वप्नांची. एकत्र कुटुंब असलेल्या या घरी अश्विनीलादेखील त्यांच्या नवीन घरासाठी आणि कुटुंबासाठी खारीचा वाटा उचलण्याची इच्छा आहे. ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे, ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आली आहे
मालिकेत शिल्पीचे आतापर्यंतचं सगळेच डाव तिच्यावर उलटले आणि सगळ्यात तिच फसली. अश्विनीला त्रास देण्यासाठी शिल्पीने विद्युतसोबतचा आपला हसता खेळता संसार देखील मोडला. यानंतर आई आणि मुलात म्हणजे शिल्पी आणि संजू यांच्या नात्यात देखील अंतर पडले. शिल्पीची वागणूक पाहून संजूचा ताबा कोर्टाने त्याच्या वडिलांकडे म्हणजेच विद्युतकडे दिला. शिल्पीने विद्युतला घटस्फोट देऊन विक्रमसोबत प्रेमाचं नाटकही केलं. मात्र, इथेही तिचा डाव फसला आहे. शिल्पी आता पुन्हा आई होणार आहे. शिल्पीला आपल्या वागण्याचा आता पश्चाताप होतोय.
दुसरीकडे आपण पाहिलं की अश्विनीला तिच्या पार्लरचा व्यवसाय वाढीसाठी मोठी संधी मिळते तेव्हा अश्विनीला तिची मोठी ऑर्डर पूर्ण करण्यासाठी सर्वजण मदत करतात सोबत शिल्पी पण मदत करते. घरात अश्विनीचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्त सगळे देवदर्शनाला जायचं ठरवतात. तेव्हा श्रेयस अश्विनीला विचारतो ह्या वाढदिवशी माझ्याकडून तुला काय गिफ्ट हवं तेव्हा अश्विनी म्हणते की शिल्पीला माफ करा आणि तेच माझ्यासाठी मोठं गिफ्ट असेल. आता श्रेयस शिल्पीला माफ करेल का? शिल्पी खरंच सुधारले का? ह्या सर्व प्रश्नांच्या उत्तर आपल्याला लवकरच मिळतील.