तू सौभाग्यवती हो...! ‘सूर्यभान जाधवां’ची खास पोस्ट, म्हणे विषय कट...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 05:14 PM2021-09-27T17:14:53+5:302021-09-27T17:20:28+5:30

आंबट-गोड नात्यांची ‘तू सौभाग्यवती हो’  (Tu Saubhagyavati Ho ) ही मालिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. पण आता...

Tu Saubhagyavati Ho goes off air actor Harish Dudhade share emotional post |  तू सौभाग्यवती हो...! ‘सूर्यभान जाधवां’ची खास पोस्ट, म्हणे विषय कट...!!

 तू सौभाग्यवती हो...! ‘सूर्यभान जाधवां’ची खास पोस्ट, म्हणे विषय कट...!!

googlenewsNext
ठळक मुद्दे‘तू सौभाग्यवती हो’ मालिकेने दोन महिन्यापुर्वीच  शंभर भागांचा टप्पा गाठला होता. मालिकेतून अभिनेता शशांक केतकरची धाकटी बहिण दीक्षा केतकर हिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते.

ऐश्वर्या आणि सुर्यभान  यांच्या नात्याची कथा सांगणारी ‘तू सौभाग्यवती हो’  (Tu Saubhagyavati Ho ) ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली होती. वयानी मोठ्या असलेल्या व्यक्तिसोबत लग्न करून निरागस मनाची ऐश्वर्या जाधवांच्या घराण्याची सून होते. सूर्यभानच्या रूक्ष स्वभावामुळे कधी कधी निराश होते आणि यादरम्यान तिच्या हातून कळत नकळत अनेक चुका होतात. पण या गोड चुकाच शेवटी ऐश्वर्या व सूर्यभानला एकमेकांच्या जवळ आणतात. आंबट-गोड नात्यांची ही गोष्ट प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. पण आता या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. 

खुद्द सूर्यभान जाधव अर्थात मालिकेत सूर्यभान जाधव यांची भूमिका साकारणारा अभिनेता हरीश दुधाडे (Harish Dudhade) याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.

  ‘ नमस्कार , भरलेल्या अंत:करणाने आणि भारलेली कलाकृती तुम्हा रसीकप्रेक्षकांच्या चरणी समर्पित करत , मी सुर्यभान तुमचा निरोप घेतो . तुम्ही केलेलं हे प्रेम मनाच्या सगळ्यात वरच्या कप्प्यात अत्तराच्या सुगंधीत कुपी सारखं कायम जवळ राहील. माझ्यासोबत तुम्ही हसलात रडलात , माझ्यावर चिडलात पण तरीही माझ्यातच रमलात , तुमच्या या निस्वार्थ सोबतीला नमन करतो ....... आज निरोप घेत असलो तरी आपली साथ अशीच कायम राहील ... विषय कट...’, अशी पोस्ट हरीशने शेअर केली आहे.
 हरीश लवकरच ‘पावनखिंड’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

‘तू सौभाग्यवती हो’ मालिकेने दोन महिन्यापुर्वीच  शंभर भागांचा टप्पा गाठला होता. मालिकेतून अभिनेता शशांक केतकरची धाकटी बहिण दीक्षा केतकर हिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. ही दीक्षाची पहिलीच मालिका. दीक्षासोबत या मालिकेत हरीश दुधाडे, ज्योती चांदेकर, रोहित फाळके, गुरू दिवेकर, प्रिया करमरकर हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत होते.

Web Title: Tu Saubhagyavati Ho goes off air actor Harish Dudhade share emotional post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.