Tu Tevha Tashi : अनामिकाचा भूतकाळ परतणार, ‘तू तेव्हा तशी’ मालिकेत नवी एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 08:00 AM2022-09-01T08:00:00+5:302022-09-01T08:00:01+5:30
Tu Tevha Tashi : झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. चाळीशी पार केलेल्या सौरभ आणि अनामिकाची फ्रेश व युथफुल लव्हस्टोरी प्रेक्षकांना चांगलीच भावली. आता या मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे.
झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ (Tu Tevha Tashi ) ही मालिका आता एका रंजक वळणावर आली आहे. चाळीशी पार केलेल्या सौरभ आणि अनामिकाची ही फ्रेश व युथफुल लव्हस्टोरी प्रेक्षकांना चांगलीच भावली. मालिका सुरू झाली तशी अल्पावधीत लोकप्रिय झाली. सौरभच्या भूमिकेत असलेला स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) आणि अनामिकाच्या भूमिकेत असलेल्या शिल्पा तुळसकरची (Shilpa Tulaskar) केमिस्ट्रीही चाहत्यांना भावली. आता या मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे.
मालिकेत सौरभ आणि अनामिकाच्या नवीन नात्याची सुरुवात होणार आहे. दोघंही लग्न करण्याच्या तयारीत असताना आता एका व्यक्तिच्या रूपात या जोडप्यापुढे नवं संकट येणार आहे. होय, मालिकेत आता एका नव्या कॅरेक्टरची एन्ट्री होणार आहे. हे नवं कॅरेक्टर कोण तर अनामिकाचा नवरा आकाश जोशी.
मालिकेत सध्या अनामिका सौरभकडे राहायला आली आहे. आता हे दोघे नवीन नात्याची सुरुवात होणार आहे. पण अचानक अनामिकाचा भूतकाळ तिच्यासमोर येणार आहे. तिचा पहिला नवरा मालिकेत दिसणार आहे. त्यामध्ये आकाशची दमदार एंट्री दाखवली आहे.
प्रोमोमध्ये सौरभ त्याच्या लग्नाची पत्रिका फायनल करत असतो. तो पत्रिकेत अनामिकापुढे सौरभचं नाव टाकायला सांगतो. तो अनामिका असं म्हणतो तेवढ्यात आकाशाची एंट्री होते आणि तो अनामिका आकाश जोशी असं नाव सांगतो. त्यामुळे सौरभ गोंधळतो. आता सौरभला तो अनामिकाचा पहिला नवरा आहे हे कधी समजेल आणि त्यानंतर अनामिका व सौरभच्या नात्यात कोणतं वळण येईल, हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे.
हा अभिनेता साकारतोय आकाशची भूमिका
अनामिकाचा पहिला नवरा आकाश जोशी याची भूमिका कोण साकारणार, हे जाणून घ्यायलही तुम्ही उत्सुक असाल. तर आता त्याचाही खुलासा झाला आहे. तर अभिनेता अशोक समर्थ आकाशची भूमिका साकारतो आहे. आकाशने मराठी व बॉलिवूड सिनेमात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. सिंघम सिनेमातील त्याने साकारलेली शिवाची भूमिका तुम्हाला आठवत असेलच. बºयाच वर्षानंतर तो छोट्या पडद्यावर परततो आहे.