तुझेच मी गीत गात आहे: अखेर मल्हारसमोर येणार स्वराज अन् वैदेहीचं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 19:18 IST2023-05-15T19:17:25+5:302023-05-15T19:18:04+5:30
tujhech mi geet gaat aahe: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे.

तुझेच मी गीत गात आहे: अखेर मल्हारसमोर येणार स्वराज अन् वैदेहीचं सत्य
छोट्या पडद्यावर गाजत असलेली लोकप्रिय मालिका म्हणजे तुझेच मी गीत गात आहे. सध्या या मालिकेत एक मोठा ट्विस्ट आला आहे. पुन्हा एकदा मालिकेत वैदेहीची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे लवकरच मल्हारची वैदेही आणि स्वरासोबत भेट होणार आहे. त्यापूर्वी आपला गमावलेला आवाज स्वराजने पुन्हा मिळवला असून तो मल्हारला सत्य परिस्थिती सांगणार आहे.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये स्वराज त्याचं आणि वैदेहीचं सत्य मल्हारसमोर सांगायला जातो. मात्र, त्याचा मामा त्याला अर्ध्यावर अडवतो.
दरम्यान, स्वराजला म्हणजे, स्वराने त्याच्या आईला वैदेहीला पाहिलं आहे. मात्र, ती खरोखरच वैदेही आहे का? तिचं सत्य मल्हारसमोर येईल का? अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरं सध्या गुलदस्त्यात आहे. मात्र, ही मालिका पाहिल्यावर प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत.