म्हणून 'तुला पाहते रे'मधील ईशा उर्फ गायत्रीने मानले चाहत्यांचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2019 07:15 AM2019-06-02T07:15:00+5:302019-06-02T07:15:00+5:30

'तुला पाहते रे' फेम गायत्री दातार हिनं आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या ह्रदयात वेगळं स्थान निर्माण केलेयं. गायत्रीबद्दल जाणून घेण्यासाठी रसिक कायमच उत्सुक असतात.

Tula pahate re fame Gayatri datar made 1 lakh followers on instagram | म्हणून 'तुला पाहते रे'मधील ईशा उर्फ गायत्रीने मानले चाहत्यांचे आभार

म्हणून 'तुला पाहते रे'मधील ईशा उर्फ गायत्रीने मानले चाहत्यांचे आभार

googlenewsNext
ठळक मुद्देगायत्रीच्या इन्स्टाग्राम फॉलोवर्सची संख्या १ लाखांच्यावर गेली गायत्रीने तिचा फिटनेस फंडा देखील फॅन्ससोबत शेअर केला होता

'तुला पाहते रे' फेम गायत्री दातार हिनं आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या ह्रदयात वेगळं स्थान निर्माण केलेयं. गायत्रीबद्दल जाणून घेण्यासाठी रसिक कायमच उत्सुक असतात. गायत्री तिच्या सोशल मीडियावरून नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी तिचे सुंदर फोटोज पोस्ट करत असते तसंच तिचं फिटनेस रुटीन, तिची आवड निवड, ऑफस्क्रिन तिच्या सहकलाकारांसोबत केलेली धमाल-मस्ती, बिहाईंड द सिन याबद्दल अपडेट्स देत असते.

गायत्रीच्या इंस्टाग्राम फॉलोवर्सची संख्या १ लाखाच्या हि पुढे गेली आहे. नुकतंच तिने तिच्या चाहत्यांचे व फॉलोवर्सचे आभार मानणारा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. प्रेक्षकांचं तिच्यावर असलेलं प्रेम हे असंच कायम राहूदे हे ही गायत्री त्या व्हिडीओमध्ये म्हणाली. 'तुला पाहते रे' मधील ईशा आणि खऱ्या आयुष्यातील गायत्री या दोघींच्या वेगवेगळ्या छटा गायत्रीच्या सोशल मीडियावर पाहायला मिळतात आणि म्हणूनच गायत्रीचे लाखो चाहते असून दिवसागणिक त्यांच्यात वाढ होत आहे.

काही दिवसांपूर्वीच गायत्रीने तिचा फिटनेस फंडा देखील फॅन्ससोबत शेअर केला होता. चित्रीकरणात कितीही व्यस्त असली तरीही गायत्री सकाळचा व्यायाम गायत्री चुकवत नाही.

रोज सकाळी ६ वाजता उठून गायत्री व्यायाम करते आणि दिवसाची सुरुवात करते. १२ - १४ तास शूटिंग केल्यानंतर व्यायामासाठी सकाळी उठणे खूप कठीण आहे. पण गायत्रीचे असं म्हणणं आहे की शूटिंगसाठी घरापासून दूर असल्यामुळे घरचं जेवण होत नाही आणि बाहेरच अनहेल्दी खाणं खाल्लं जातं त्यामुळे शरीराला शिस्त लागणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी व्यायाम केलाच पाहिजे. बारीक होण्यापेक्षा फिट राहण्यासाठी व्यायाम केला पाहिजे असं गायत्रीचे मत आहे.  
 

Web Title: Tula pahate re fame Gayatri datar made 1 lakh followers on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.