तुला शिकवीन चांगलाच धडा: सासऱ्यांची मदत करणाऱ्या अक्षरावर होणार हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 15:27 IST2023-12-07T15:26:47+5:302023-12-07T15:27:27+5:30
Tula shikvin changlach dhada: चारुहास सरांचं गुपित जाणून घेत असतानाच अक्षरावर होतो हल्ला

तुला शिकवीन चांगलाच धडा: सासऱ्यांची मदत करणाऱ्या अक्षरावर होणार हल्ला
छोट्या पडद्यावर अलिकडेच 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका सुरु झाली आहे. शिवानी रांगोळे (shivani rangole), कविता मेढेकर (kavita medhekar) आणि हृषिकेश शेलार (hrishikesh shelar) यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेली ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. त्यातच या मालिकेत दिवसेंदिवस रंजक वळण येत असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकताही वाढताना दिसते. यामध्येच आता अक्षराच्या जीवाला धोका निर्माण होणार आहे.
चारुहास सरांच्या तब्येतीविषयी आणि त्यांच्या विचित्र वागण्यामागे काही तरी कारण आहे अक्षराला कळून चुकलं आहे. त्यामुळे ती आता त्या गोष्टीचा शोध घेऊ लागली आहे. यामध्येच चारुहास सरांनी एका चिठ्ठीवर help असं लिहून तिच्याकडे मदतही मागितली आहे. त्यामुळे नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय याची जाणीव अक्षराला झाली आहे. परंतु, अक्षरा चारुहास सरांचं गुपित जाणून घेण्याचा प्रयत्न करते हे भुवनेश्वरीला कळलं असून ती चांगलीच संतापली आहे.
चारुहास सरांनी अक्षराकडे मदत मागितल्यानंतर पुन्हा एकदा ती त्यांना मदत करायला जाते. मात्र, त्याचवेळी तिच्यावर कोणीतरी हल्ला करतं. त्यामुळे आता अक्षरावर हल्ला करणारा व्यक्ती नेमका आहे तरी कोण? भुवनेश्वरीचा हा नवा डाव तर नसेल ना? चारुहास सरांना अक्षरा यापुढे कशी मदत करणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहे.