'तुला शिकवीन चांगलाच धडा'मधली अक्षरा पाचवीत असताना दिसायची अशी, व्हिडीओ आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 18:38 IST2023-10-04T18:37:29+5:302023-10-04T18:38:10+5:30
Shivani Rangole : अभिनेत्री शिवानी रांगोळे हिने बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केली आहे. तिचा असाच एक लहानपणीचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

'तुला शिकवीन चांगलाच धडा'मधली अक्षरा पाचवीत असताना दिसायची अशी, व्हिडीओ आला समोर
छोट्या पडद्यावरील मालिका 'तुला शिकवीन चांगलाच धडा' (Tula shikvin Changlach Dhada) ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले. नुकतेच या मालिकेत अक्षरा आणि अधिपतीचा लग्नसोहळा पार पडला. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते आहे. अक्षराची भूमिका अभिनेत्री शिवानी रांगोळे (Shivani Rangole) हिने साकारली आहे. शिवानी सोशल मीडियावर सक्रीय असून ती चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान तिची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे.
अभिनेत्री शिवानी रांगोळे हिने बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केली आहे. तिने बऱ्याच मालिका, नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून रसिकांच्या मनावर छाप उमटवली आहे. तिचा असाच एक लहानपणीचा व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात ती मुख्य भूमिकेत दिसते आहे. यात ती तिच्या वडिलांसोबत बसून गणित शिकताना दिसतेय. हा व्हिडिओ तिला एका चाहत्याने पाठवला होता. तिला ही तूच आहेस का असा प्रश्नही विचारला.
'उपनिषद गंगा' नावाच्या मालिकेतली ही छोटीशी क्लिप!
हा व्हिडिओ आता शिवानीने इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, माझं लहानपणीचं काम अचानक इंस्टाला दिसू लागलं आणि मला खूप लोकांनी विचारलं की ' ही तूच आहेस का?'!! गंमत वाटली की इतक्या वर्षांनी ही मी बहुतेक तशीच दिसत असेन म्हणून लोकांनी लगेच ओळखलं! इयत्ता पाचवीत असताना डॉ.चंद्रप्रकाश द्विवेदी ह्यांच्या 'उपनिषद गंगा' नावाच्या मालिकेतली ही छोटीशी क्लिप!
शिवानीच्या पोस्टवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. एका युजरने लिहिले की, छोटी मास्तरीण बाई. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, खूप छान दिसताय तुम्ही शिवानी मॅम क्युट दिसतंय.