Tunisha Sharma : मालिकेच्या सेटवर अभिनेत्री तुनिशा शर्माची गळफास लावून आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 07:14 PM2022-12-24T19:14:29+5:302022-12-24T19:15:31+5:30

Tunisha Sharma: हिंदी टेलिव्हिजनवरील अभिनेत्री तुनिषा शर्माने मालिकेच्या सेटवर गळफास लावून आत्महत्या केली.

Tunisha Sharma: Actress Tunisha Sharma committed suicide on the sets of the serial | Tunisha Sharma : मालिकेच्या सेटवर अभिनेत्री तुनिशा शर्माची गळफास लावून आत्महत्या

Tunisha Sharma : मालिकेच्या सेटवर अभिनेत्री तुनिशा शर्माची गळफास लावून आत्महत्या

googlenewsNext

मुंबई (मंगेश कराळे) : हिंदी टेलिव्हिजनवरील अभिनेत्री तुनिषा शर्माने मालिकेच्या सेटवर गळफास लावून आत्महत्या केली. तिला रुग्णालयात नेले असता तिला मृत घोषित करण्यात आले. यासंदर्भात वालीव पोलिसांनी माहिती दिली आहे. सध्या तुनिशा सब टीव्हीच्या दास्तान-ए-काबुल या शोमध्ये मुख्य भूमिकेत होती, त्यामुळे तिने इतके मोठे पाऊल का उचलले हे अद्याप समजू शकलेलं नाही. 

अभिनेत्री तुनfषा शर्मा हिने शनिवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास नायगावच्या रामदेव स्टुडिओच्या बाथरूममध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोनी सब चॅनेलवरील अलिबाबा दास्ताने काबुल या मालिकेत मुख्य अभिनेत्री म्हणून ती काम करत होती. तिच्या या आत्महत्येमुळे छोट्या पडद्यावर खळबळ माजली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ती शनिवारी मालिकेच्या सेटवर आली होती. पण ती सेटवर दिसली नाही. त्यानंतर तिच्या सहकारी तिला बोलावण्यासाठी गेल्या. त्यांनी दरवाजा ठोठावला. पण तिने दरवाजा न उघडल्यामुळे दरवाजा तोडण्यात आला. तिने पंख्याला गळफास घेतल्याचे पाहून सर्व सहकाऱ्यांना धक्का बसला. तिला उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले पण तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तिचे कोणत्या अभिनेत्यासोबत अफेअर किंवा काही वाद झाल्याचे सूत्रांकडून समजते आहे. पण, तिने आत्महत्या का केली व कोणत्या कारणामुळे याचा नालासोपारा येथील वालीव पोलीस तपास करत असल्याचे उपायुक्त सुहास बावचे यांनी लोकमतला सांगितले.

Web Title: Tunisha Sharma: Actress Tunisha Sharma committed suicide on the sets of the serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.