Tunisha Sharma Case : तुनिषा प्रकरणात शिजान खानच्या अडचणीत वाढ; कोर्टानं सुनावली १४ दिवसांची कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 02:01 PM2022-12-31T14:01:59+5:302022-12-31T14:02:25+5:30

Tunisha Sharma Case : अभिनेता शिजान खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Tunisha Sharma Case : Increase in Shizaan Khan's problem in Tunisha case; Court ordered 14 days custody | Tunisha Sharma Case : तुनिषा प्रकरणात शिजान खानच्या अडचणीत वाढ; कोर्टानं सुनावली १४ दिवसांची कोठडी

Tunisha Sharma Case : तुनिषा प्रकरणात शिजान खानच्या अडचणीत वाढ; कोर्टानं सुनावली १४ दिवसांची कोठडी

googlenewsNext

अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी शिजान खान (Sheezan Khan) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून तो पोलिसांच्या ताब्यात आहे. आता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

तुनिषा शर्मा आत्महत्ये प्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे. अभिनेता शिजान खानवर तुनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे. 


वालीव पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी शिजानच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. शिजानला त्याचे गुगल अकाऊंट आणि मेल आयडीचा पासवर्ड आठवत नाही. पण पोलिसांना त्याचे इमेल अकाउंटदेखील तपासायचे आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी अभिनेत्याला पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली होती. शिजान खानचे वकील म्हणाले, गेल्या सात दिवसांपासून शिजान पोलिसांच्या ताब्यात आहे. तसेच त्याचा फोनदेखील पोलिसांनी जप्त केला आहे. त्यामुळे आता पोलीस कोठडीची आवश्यकता नाही. अशातच आता वसई न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

तुनिषा शर्मा 'अलीबाबा : दास्तान ए कबूल' या मालिकेत काम करत होती. मालिकेतील सहकलाकार शिजान खानवर तुनिषा प्रेम करत होती. १५ दिवसांपूर्वी शिजान खानने तिच्यासोबत ब्रेकअप केले व तिला सोडून दिले होते.शनिवारी तुनिषा वॉश रूममध्ये गेली होती आणि बराच वेळ सेटवर आली नाही. त्यामुळे सेटवरील कर्मचाऱ्यांनी रेस्ट रूमचा दरवाजा तोडला तेव्हा ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. 
 

Web Title: Tunisha Sharma Case : Increase in Shizaan Khan's problem in Tunisha case; Court ordered 14 days custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.