Tunisha Sharma Death: तुनिषाच्या आत्महत्येचं नेमकं कारण काय? पोलिसांच्या FIR मधून झाला मोठा खुलासा! वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 03:18 PM2022-12-25T15:18:41+5:302022-12-25T15:20:07+5:30

Tunisha Sharma Death Case: टेलिव्हिजन अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्याप्रकरणामुळे टेलिव्हिजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

tunisha sharma death fir copy revealed she was stressed due to breakup with sheezan khan | Tunisha Sharma Death: तुनिषाच्या आत्महत्येचं नेमकं कारण काय? पोलिसांच्या FIR मधून झाला मोठा खुलासा! वाचा...

Tunisha Sharma Death: तुनिषाच्या आत्महत्येचं नेमकं कारण काय? पोलिसांच्या FIR मधून झाला मोठा खुलासा! वाचा...

googlenewsNext

Tunisha Sharma Death Case: टेलिव्हिजन अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्याप्रकरणामुळे टेलिव्हिजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. अवघ्या २० वर्षांच्या अभिनेत्रीनं मालिकेच्या सेटवरच गळफास घेऊन आत्महत्या केली आणि एकच गहजब उडाला आहे. तिच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. तसंच तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. आता हळूहळू तिच्या आत्महत्येसंदर्भातील माहिती समोर येऊ लागली आहे. 

आत्महत्या की..., तुनिषा शर्माचा मृत्यू कसा झाला? पोस्टमार्टेम रिपोर्ट आला समोर

तुनिषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणाला माध्यमांनी उचलून धरल्यामुळे आता पोलिसही अॅक्शन मोडमध्ये तपास करत आहेत. तुनिषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरची कॉपी आता समोर आली आहे. यातून तुनिषाच्या आत्महत्येबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. 

एफआयआरच्या कॉपीमधील नमूद माहितीनुसार, तुनिषा शर्मा तिचा सहकलाकार शीजान खानसोबत रिलेशनशिपमध्ये होती. १५ दिवसांपूर्वीच शीजान याने तुनिषासोबत ब्रेकअप केलं होतं. ज्यामुळे तुनिषा खूप तणावाखाली होती. ब्रेकअपमुळेच ती तणावात होती आणि तिनं आत्महत्या करण्याचं पाऊल उचललं असं पोलिसांनी नमूद केलं आहे. याच कारणामुळे शीजान याला पोलिसांनी अटक केली आहे. 

पोस्टमार्टम रिपोर्टमधून खुलासा
पोस्टमार्टेमच्या रिपोर्टनुसार तुनिशा शर्माचा मृत्यू हा श्वास गुदमरल्यामुळे झाला आहे. गळफास लावल्यानंतर श्वास गुदमरल्याने  तुनिषा हिचा मृत्यू झाला. तिच्या शरीरावर अन्य कुठल्याही प्रकारच्या जखमांच्या खुणा आढळलेल्या नाहीत.  तुनिषा हिने आत्महत्या केल्यानंतर ती गर्भवती असल्याच्या अफवा उडाल्या होत्या. मात्र ती गर्भवती असल्याची बाब पोलीस सूत्रांनी फेटाळून लावली आहे.

शीजान विरोधात गुन्हा दाखल
तुनिषाच्या आईनं शीजान खान याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शीजान याला कंटाळूनच तुनिषा हिनं आत्महत्या केल्याचा दावा तिच्या आईनं केलं आहे. आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शीजान विरोधात एफआयआर दाखल करत त्याला अटक केली आहे. पोलिसांनी शीजान विरोधात कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत. 

शीजानच्या मेकअप रुममध्ये घेतला गळफास
धक्कादायक बाब म्हणजे तुनिषा हिनं मालिकेच्या सेटवर शीजान खान याच्या मेकअप रुममध्येच गळफास लावून आत्महत्या केली. जेव्हा आपण शूट करुन मेकअप रुममध्ये परतलो तेव्हा दरवाजा बंद होता आणि तो उघडत नव्हता. त्यामुळे दरवाजा तोडून आत जावं लागलं. आत तुनिषा गळफास घेतलेल्या अवस्थेत होती. तिला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण तोवर तिचा मृत्यू झाला होता, असं शीजान यानं पोलीस चौकशीत सांगितलं आहे. 

20 वर्षांची तुनिषा होती कोट्यवधीची मालकीण, इतकी संपत्ती मागे सोडून गेली अभिनेत्री...!

तुनिषा शर्मा एक गुणी टेलिव्हिजन अभिनेत्री होती. बालकलाकार म्हणून तिनं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. कमी वयातच तुनिषानं या क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली होती. तुनिषानं टेलिव्हिजन शोसोबतच चित्रपटातही काम केलं आहे. तुनिषा शर्मा टेलिव्हिजन शो 'अलिबाबा: दास्तान-ए-काबुल'मध्ये पाहायला मिळाली होती. तसंच तिनं 'फितूर' आणि 'बार बार देखो' या चित्रपटांमध्ये यंग कतरिना कैफची भूमिका साकारली होती.

Web Title: tunisha sharma death fir copy revealed she was stressed due to breakup with sheezan khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.