शिझानला 'खतरों के खिलाडी'मध्ये घेणं मेकर्सच्या आलं अंगाशी, तुनिशाच्या आईनं चॅनेल पाठवली लीगल नोटिस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 02:24 PM2023-05-05T14:24:22+5:302023-05-05T14:30:07+5:30
शिझान खानला शोमध्ये घेतल्याप्रकरणी तुनिशाच्या आईने वाहिनीच्या या निर्णयाला विरोध करत मोठे पाऊल उचलले आहे.
टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणातील आरोपी शिझान खानला कोर्टाने त्याचं प्रोफोशन आयुष्य पाहता परदेशात जाण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे, मात्र त्यानंतरही या अभिनेत्याचा अडचणी काही संपत नाहीये. होय, अशी बातमी आहे की शिझान टीव्हीचा सर्वात लोकप्रिय शो 'खतरों के खिलाडी' सीझन 13 चा भाग बनणार आहे.
रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी'च्या शूटिंगसाठी अभिनेता लवकरच शोच्या टीमसोबत परदेशात रवाना होणार आहे. दरम्यान, तुनिशाच्या आईने न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. यासोबतच त्यांनी वाहिनीच्या या निर्णयाला विरोध करत मोठे पाऊल उचलले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीच्या आईचे मत आहे की, ज्या आरोपीला नुकताच कोर्टाने जामीन मंजूर केला आहे, तो शोचा भाग कसा बनू शकतो. या निर्णयामुळे तुनिषाची आई चांगलीच नाराज झाली असून त्यांनी वाहिनीला नोटीस पाठवली आहे. याला तुनिशाचे काका पवन शर्मा यांनीही दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की होय हे खरे आहे की आम्ही वाहिनीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
त्याने पुढे सांगितले की जर एखाद्या व्यक्तीवर केस चालू असेल आणि त्याच्याविरुद्ध आरोपपत्र असेल तर चॅनल त्याला शोचा भाग कसा बनवू शकते? शिझानला नुकताच जामीन मिळाला असून खटला सुरू आहे. ते म्हणाले की अचानक त्याला खतरों के खिलाडीचा भाग होण्यासाठी संपर्क करण्यात आला? कोणत्या आधारावर? टीआरपीसाठी चॅनल एका आरोपीला प्रोत्साहन देत आहे.
अलीबाबा दास्तान ए काबुल' या मालिकेची अभिनेत्री तुनिशा शर्माने (Tunisha Sharma) गतवर्षी डिसेंबर महिन्यात मालिकेच्याच सेटवर गळफास घेत आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येसाठी तिचा सहकलाकार व बॉयफ्रेन्ड शिझान खानला (Sheezan Khan) जबाबदार धरण्यात आलं होतं. तुनिशाच्या आईच्या तक्रारीवरून शिझानला अटक करण्यात आली होती. दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ शिझान तुरुंगात होता. मार्चमध्ये त्याला जामीन मंजूर करण्यात आला.