Tunisha Sharma death Case: तुनिषा शर्माच्या आईचा शीजान खानवर खळबळजनक आरोप; म्हणाल्या- "शीजान ड्रग्स घ्यायचा नि तिला..."

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 08:40 PM2022-12-29T20:40:24+5:302022-12-29T20:40:52+5:30

याआधी तुनिषाच्या मामाने देखील धक्कादायक आरोप केलेत

Tunisha Sharma mother Vinita Sharma shocking revelation says Sheezan Khan used to consume drug also enrolled Love Jihad Angle | Tunisha Sharma death Case: तुनिषा शर्माच्या आईचा शीजान खानवर खळबळजनक आरोप; म्हणाल्या- "शीजान ड्रग्स घ्यायचा नि तिला..."

Tunisha Sharma death Case: तुनिषा शर्माच्या आईचा शीजान खानवर खळबळजनक आरोप; म्हणाल्या- "शीजान ड्रग्स घ्यायचा नि तिला..."

googlenewsNext

Tunisha Sharma mother Shocking Revelation: तुनिषा शर्मा हिचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचे बोलले जात आहे. तुनिषा टीव्ही सीरियल 'अली बाबा-दास्तान-ए-काबुल'मध्ये अभिनय करत होती. याच सिरियलमधील नायक अभिनेता शीजान खान याच्याशी ती रिलेशनशिपमध्ये होती असेही सांगितले जात आहे. मात्र तुनिषा आणि शीजान यांच्यात कालांतराने वाद होऊ लागले आणि त्यांचे ब्रेक-अप झाल्याच्याही बातम्या आल्या. या सिरियलच्या कलाकारांची पोलीस कसून चौकशी करत आहेत. तसेच, तुनिषाची आई वनिता शर्मा यांच्याही जबाब नोंदवण्यात येत आहे. आज पोलिसांनी तिच्या आईच्या दुसऱ्यांदा जबाब नोंदवला असता, त्यांनी शीजान ड्रग्स सेवन करत असल्याचा आरोप केला. याशिवाय, त्यांनी आणखीही एक दावा केला आहे. 

तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणाबाबत अभिनेत्रीची आई वनिता शर्मा यांनी मोठा खुलासा केला. वनिता शर्माने तुनिषाचा प्रियकर शीजानवर आधीही अनेक आरोप केले होते. शीजान आणि तुनिषा यांच्यातील नातेसंबंध खराब झाल्यामुळेच तुनिषाने टोकाचं पाऊल उचललं असे त्यांनी म्हटले होते. आज, एका वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, तुनिषाच्या आईने पोलिसांसमोर जबाब नोंदवताना सांगितले की शीजान हा ड्रग्जसेवन करत असे. पोलीस तुनिषा प्रकरणात 'लव्ह जिहाद' अँगलनेही तपास करत आहेत. याच दरम्यान, तुनिषाच्या आईने असे सांगितले की, शीजान तुनिशाला उर्दू शिकवत होता. तुनिषाच्या आईच्या या आरोपांमुळे आता या प्रकरणातील गुंता अधिकच वाढत असल्याचे दिसत आहे.

कालच, तुनिषाचे मामा पवन शर्मा यांनी पोलिसांना माहिती देत असताना काही धक्कादायक खुलासे केले होते. तुनिषाच्या मृत्यूबाबत त्यांनी लव्ह जिहादचा संशय व्यक्त केला. कारण पवन शर्मा हिजाब परिधान केलेल्या तुनिषाबद्दल बोलले आणि सोशल मीडियावर तुनिषाने हिजाब परिधान केल्याचा एक फोटो देखील असल्याचे दिसून आले. त्या फोटोमध्ये ती शीजानसोबत दिसत आहे आणि कॅमेऱ्याकडे हसताना बघत आहे. पण समोरील मूर्ती ही गणपती बाप्पाची असल्याने हा फोटो नक्की कधी काढला आहे, त्या फोटोचा उद्देश काय होता, याबाबत साशंकता आहे. पण तसे असले तरी, "तुनिषाच्या वागण्यात खूप बदल झाला होता. ती शीजानच्या सोबत राहून खूपच बदलत चालली होती आणि तिने हिजाब घालायला सुरुवात केली होती," असे तिचे मामा पवन शर्मा म्हणाले होते.

सध्या पोलीस प्रत्येक बाजूने तपास करत आहेत. एकीकडे तुनिषाच्या आईने शीजनवर ड्रग्ज सेवन केल्याचा आरोप केला तर दुसरीकडे मामा पवन शर्मा यांनी सांगितले की, तुनिषाच्या संपर्कात आल्यापासून ती खूप बदलली आहे. तुनिषानेही हिजाब घालायला सुरुवात केली होती. त्यामुळे या प्रकरणाला आता काही वेगळे वळण मिळते का, याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे.

Web Title: Tunisha Sharma mother Vinita Sharma shocking revelation says Sheezan Khan used to consume drug also enrolled Love Jihad Angle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.