'शहजादीचा मृत्यू आणि अलीबाबाला जेल'; तुनिशाच्या जागी दिसणार 'अवनीत कौर' ? तुनिशाच्या मालिकेचा चॅप्टर २...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 13:34 IST2023-01-06T13:30:07+5:302023-01-06T13:34:44+5:30
अलीबाबा चॅप्टर १ ऑफ एयर करत चॅप्टर २ ची सुरुवात दाखवण्यात येणार आहे. 'शो'च्या दुसऱ्या चॅप्टरसाठी आता नवीन पात्रांचा शोध घेतला जात आहे.

'शहजादीचा मृत्यू आणि अलीबाबाला जेल'; तुनिशाच्या जागी दिसणार 'अवनीत कौर' ? तुनिशाच्या मालिकेचा चॅप्टर २...
टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) आत्महत्येनंतर अलीबाबा -दास्तान ए काबुल (Alibaba Dastaan e kabul) या मालिकेचे काय होणार असा प्रश्न होता. तुनिशा आणि शिझान खान (Shizaan Khan) हे मुख्य पात्र होते. टीआरपी मध्ये मालिकेचा चांगला परफॉर्मन्स होता.मात्र तुनिशाची आत्महत्या आणि शिझानची तुरुंगात रवानगी यामुळे मालिका थांबली. पण आता मेकर्सने मोठा निर्णय घेतला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, अलीबाबा चॅप्टर १ ऑफ एयर करत चॅप्टर २ ची सुरुवात दाखवण्यात येणार आहे. 'शो'च्या दुसऱ्या चॅप्टरसाठी आता नवीन पात्रांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान अलीबाबाच्या भूमिकेसाठी अभिनेता अभिषेक निगमला (Abhishek Nigam) साईन करण्यात आल्याची चर्चा आहे, तर शहजादी मरियम च्या भूमिकेसाठी अवनीत कौर दिसेल अशी शक्यता आहे.
अवनीत कौर तुनिशाच्या जवळच्या मित्रपरिवारातली एक होती. अलीबाबाच्या चॅप्टर २ मध्ये अवनीत असेल यावर अजून शिक्कामोर्तब झालेले नाही. जर ही नावं फायनल झाली तर अभिषेक आणि अवनीत पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसतील. अवनीतने याआधी अभिषेकचा भाऊ सिद्धार्थ निगमसोबत (Siddharth Nigam) 'अलादीन' या मालिकेत काम केले आहे. मालिकेतील ही जोडी खूप पसंत केली गेली. आता अभिषेक आणि अवनीतची जोडीही खूप पसंत केली जाईल.
\
स्टुडिओमध्ये बदल
तुनिशाने 'अलीबाबा दास्तान ए कबुल'च्या सेटवरच मेकअपरुममध्ये आत्महत्या केली. यानंतर आता सेटवर भीतीचे वातावरण आहे. इतर कलाकार शूटिंगला यायला घाबरत आहेत. सध्या काही बॅकअप एपिसोड्स तयार आहेत जे ऑनएअर सुरु आहेत. मात्र अशा भीतीच्या वातावरणात चॅप्टर २ ची सुरुवात करणं कठीण आहे. आता आलेल्या नव्या माहितीनुसार मालिकेचा सेट बदलण्यात आला आहे. नव्या स्टुडिओमध्ये शूटिंगची तयारी सुरु झाली आहे. जुन्या सेटची आधी पूजा करुन मग शूटिंग सुरु होणार आहे.