Tunisha Sharma : तुनिषाच्या आत्महत्येने मालिकेच्या सेटवर लोकांमध्ये भीती, सेटवर महिला असुरक्षित; एसआयटी चौकशीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 10:49 AM2022-12-26T10:49:35+5:302022-12-26T10:50:31+5:30

मालिकेचा सेट महिलांसाठी सुरक्षित नाही तिथे सर्व स्टाफ घाबरला आहे त्यामुळे या प्रकरणी एसआयटी (SIT) चौकशी व्हावी अशी मागणी सिने वर्कर्स असोसिएशनने केली आहे.

tunisha-sharma-suicide-case-all-india-cine-workers-association-demands-SIT-probe-in-this-matter | Tunisha Sharma : तुनिषाच्या आत्महत्येने मालिकेच्या सेटवर लोकांमध्ये भीती, सेटवर महिला असुरक्षित; एसआयटी चौकशीची मागणी

Tunisha Sharma : तुनिषाच्या आत्महत्येने मालिकेच्या सेटवर लोकांमध्ये भीती, सेटवर महिला असुरक्षित; एसआयटी चौकशीची मागणी

googlenewsNext

Tunisha Sharma : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येने मनोरंजन विश्व हादरले आहे. मालिकेच्या सेटवरच २० वर्षीय तुनिषाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र मालिकेचा सेट महिलांसाठी सुरक्षित नाही तिथे सर्व स्टाफ घाबरला आहे त्यामुळे या प्रकरणी एसआयटी (SIT) चौकशी व्हावी अशी मागणी सिने वर्कर्स असोसिएशनने केली आहे.

तुनिषा शर्मा 'अलीबाबा : दास्तान ए कबूल' या मालिकेत काम करत होती. तिच्या आत्महत्येप्रकरणी ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनचे (AICWA) अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता  यांनी सरकारकडे एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की मी या सेटवर गेलो होतो जिथे तुनिषाने आत्महत्या केली. तिथे काही लोक खूप घाबरले आहेत. काही ना काही गडबड सेटवर नक्कीच झाली आहे. सरकारने याची दखल घेतली पाहिजे आणि एसआयटी समिती नेमली पाहिजे. त्यातून गोष्टी समोर येतील. सेटवर महिला सुरक्षित नाहीत. सेट खूपच आतमध्ये आहे. आणि तिथून यायला जायला लोक घाबरतात. एआयसीडब्ल्यूए ने याआधीही ट्विट करुन फिल्म इंडस्ट्रीमध्ये होणाऱ्या वाढत्या आत्महत्या प्रकरणांबद्दल चिंता व्यक्त केली होती. 

ब्रेकअपमुळे केली आत्महत्या 

मालिकेतील सहकलाकार शिजान खानवर तुनिषा प्रेम करत होती. १५ दिवसांपूर्वी शिजान खानने तिच्यासोबत ब्रेकअप केले व तिला सोडून दिले होते.शनिवारी तुनिषा वॉश रूममध्ये गेली होती आणि बराच वेळ सेटवर आली नाही. त्यामुळे सेटवरील कर्मचाऱ्यांनी रेस्ट रूमचा दरवाजा तोडला तेव्हा ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. 

Tunisha sharma : शिझान खानला ४ दिवसांची पोलीस कोठडी; तुनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप

निर्माते अशोक पंडित यांनी ट्विट केले की, आयुष्यातील कोणतेही दु:ख इतके मोठे असू शकत नाही की, त्यावर मात करता येत नाही. रश्मी देसाई, करणवीर बोहरा आणि सुगंधा एस मिश्रा या छोट्या पडद्यावरील कलाकारांनी शर्मा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. रश्मी देसाई यांनी म्हटले आहे की, मी तिला कधीच भेटले नाही, पण तिला ओळखत होते. तिच्या कुटुंबीयांना आणि प्रियजनांना हे दु:ख सोसण्याचे बळ मिळो. करणवीर बोहरा यांनी ट्विट केले की, हे अत्यंत दु:खद आहे.  तुनिषा शर्मा यांच्या आत्म्याला ईश्वर शांती देवो. सुगंधा एस. मिश्रा यांनी म्हटले आहे की, एवढ्या तरुण प्रतिभेच्या निधनाची बातमी क्लेशदायक आहे.

Web Title: tunisha-sharma-suicide-case-all-india-cine-workers-association-demands-SIT-probe-in-this-matter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.