Tunisha Sharma Suicide Case: शिजान खानला जेल की बेल? जाणून घ्या तुनिषा प्रकरणात काय म्हणाले कोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 16:56 IST2023-01-13T16:50:51+5:302023-01-13T16:56:11+5:30
ब्रेकअपनंतर तुनिषा डिप्रेशनमध्ये असल्याचे कोर्टाने मान्य केले. जाणून घ्या शिजानच्या जामीनवर अर्जावर कोर्ट काय म्हणाले ते..

Tunisha Sharma Suicide Case: शिजान खानला जेल की बेल? जाणून घ्या तुनिषा प्रकरणात काय म्हणाले कोर्ट
टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येचं गूढ उकलण्याच नाव घेत नाहीय. या प्रकरणात रोज नवनवीन अपडेट्स येत आहेत. आज या प्रकरणाची सुनावणी होणार होती. २४ डिसेंबर २०२२ला तुनिषाने अली बाबा:दास्तान-ए-काबुल'
सेटवर आत्महत्या केली होती. तुनिशाची आई वनिता शर्मा यांनी तक्रार दाखल केली. शिजान खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली 25 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. याप्रकरणी शिजानने जामीनासाठी अर्ज दिला होता, तो कोर्टाने फेटाळला आहे.
दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे वसई न्यायालयाने मान्य केले. 15 डिसेंबरला दोघांचे ब्रेकअप झाले आणि 16 डिसेंबरला तुनिषाला पॅनिक अटॅक आला. 24 डिसेंबर रोजी तुनिषाने आत्महत्या केली तेव्हा शिजान हा तुनिषाला भेटणारा शेवटचा व्यक्ती होता. सीसीटीव्ही फुटेजमध्येही या गोष्टीची पुष्टी झाली आहे.
ब्रेकअपनंतर तुनिषा डिप्रेशनमध्ये असल्याचे कोर्टाने मान्य केले. आत्महत्येपूर्वी तुनिषा शिजानच्या खोलीत होती. तपासाच्या या टप्प्यावर जामीन मंजूर झाल्यास प्रकरणावर परिणाम होऊ शकतो. या सर्व परिस्थितीचा तपास करणे आवश्यक आहे.
शिझान खानच्या कुटुंबाने केला होता पलटवार
तुनिशा मृत्यू प्रकरणी शिझान खान (Sheezan Khan) हा अटकेत असून दोन्ही कुटुंब एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. शिझान खानच्या कुटुंबाने पत्रकार परिषद घेत तुनिशाच्या आईवरच गंभीर आरोप केले होते. तुनिषाचा एका भलत्याच मुलासोबतचा रोमॅंटिक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ स्वत: त्या मुलानेच शेअर केला होता. गौरव भगत (Gaurav Bhagat) हा एक युट्युबर आहे. तो तुनिषाच्या खूपच जवळचा असल्याचं व्हिडिओतून दिसून येते. या दोघांमध्ये नक्की काय होतं असे प्रश्न उपस्थित केले गेले. गौरवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ अपलोड केला आहे. 'तुनिषा तू नेहमी स्मरणात राहशील तू एक खूप छान मुलगी होतीस' असे कॅप्शन त्याने दिले होते.