Tunisha Sharma Suicide Case: 'तुनिषा असती तर...', तुरुंगातून बाहेर आलेल्या शिझान खानची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 12:12 PM2023-03-06T12:12:59+5:302023-03-06T12:19:36+5:30
तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी तुनिषा शर्माच्या आईच्या तक्रारीवरून घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी शिजान खानला अटक केली होती. शिझान खान ७० दिवस तुरुंगात होता.
Tunisha Sharma Suicide Case: टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्या प्रकरणातील आरोपी शीझान खान(Sheezan Khan) ने जामीन मिळाल्यानंतर आता तिच्या कुटुंबासह सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. 70 दिवसांनंतर आपल्या घरी परतलेला शिझान घरी परतला आहे. तो म्हणतो की तो तुनिषाला खूप मिस करतो. सध्या त्याला कुटुंबासोबत राहून विश्रांती घ्यायची आहे.
बॉम्बे टाईम्सच्या रिपोर्टनुसार शिझान म्हणाला, 'आज मला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा खरा अर्थ कळला आहे. हे मला आज कळले. बाहेर आल्यावर जेव्हा मी माझ्या आई आणि बहिणीला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले. शिझान पुढे म्हणाला, 'अखेर आता मी माझ्या कुटुंबासोबत आहे. आता मला फक्त काही दिवस माझ्या कुटुंबासोबत रहायचे आहे. आईच्या मांडीवर डोकं ठेवून मला आराम करायचा आहे. माझ्या बहिणींसोबत वेळ घालवायचा आहे.
तुनिषाबद्दल शिझान म्हणाला,- 'मला तुनिषाची खूप आठवण येते, ती जिवंत असती तर तिने माझ्यासाठी लढा दिला असता.' तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी शिझान खान गेल्या तीन महिन्यांपासून चर्चेत आहे. शीजनचे कुटुंबीय त्याच्या जामिनाची वाट पाहत होते. तुनिषा आत्महत्या प्रकरणात आता शीजानला थोडा दिलासा मिळाला आहे.
तुनिषाबद्दल शिझान म्हणाला,"मला तुनिषाची खूप आठवण येत आहे. ती जिवंत असती तर आज माझ्यासाठी लढली असती". तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी शिझान खान गेल्या दोन महिन्यांपासून चर्चेत आहे.
Maharashtra | Television actor Sheezan Khan accused in television actress Tunisha Sharma's suicide case released on bail from Thane Central Jail today pic.twitter.com/KWRSwIYNtD
— ANI (@ANI) March 5, 2023
काय प्रकरण आहे?
तुनिषाने २४ डिसेंबरला कामण येथील अली बाबाच्या सेटवर आत्महत्या केली होती. त्यानंतर वालीव पोलिसांनी शिजान खान यास तुनिषा हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केली होती. शिजान खान २१ वर्षीय तुनिषा शर्मासोबत रिलेशनशिपमध्ये होता, पण नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. तुनिषा शर्माच्या आईच्या तक्रारीवरून घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी शिजान खानला अटक केली होती. अटक झाल्यापासून तो न्यायालयीन कोठडीत होता. आता ७० दिवसांनंतर जामीन मिळाला आहे.