Tunisha Sharma Case : तुनिशाच्या आयुष्यात होता एक भलताच मुलगा ? दोघांचा रोमॅंटिक व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 09:07 AM2023-01-04T09:07:51+5:302023-01-04T09:10:45+5:30

नवीन अपडेटनुसार तुनिशाचा एका भलत्याच मुलासोबतचा रोमॅंटिक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ स्वत: त्या मुलानेच शेअर केला आहे.

tunisha-sharma-was-with-some-other-guy-who-is-that-mystry-man-find-out | Tunisha Sharma Case : तुनिशाच्या आयुष्यात होता एक भलताच मुलगा ? दोघांचा रोमॅंटिक व्हिडिओ व्हायरल

Tunisha Sharma Case : तुनिशाच्या आयुष्यात होता एक भलताच मुलगा ? दोघांचा रोमॅंटिक व्हिडिओ व्हायरल

googlenewsNext

Tunisha Sharma Case : टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्येप्रकरणी रोज नवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणी शिझान खान (Sheezan Khan) हा अटकेत असून दोन्ही कुटुंब एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. नुकतेच शिझान खानच्या कुटुंबाने पत्रकार परिषद घेत तुनिशाच्या आईवरच गंभीर आरोप केले. आता नवीन अपडेटनुसार तुनिशाचा एका भलत्याच मुलासोबतचा रोमॅंटिक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ स्वत: त्या मुलानेच शेअर केला आहे.

कोण आहे गौरव भगत 

Tunisha Sharma Death Case: 'मलाच कळत नाहीए मला काय होतंय..' तुनिशाची ऑडिओ क्लिप व्हायरल

गौरव भगत (Gaurav Bhagat) हा एक युट्युबर आहे. तो तुनिशाच्या खूपच जवळचा असल्याचं व्हिडिओतून स्पष्ट कळत आहे.आता या दोघांमध्ये नक्की काय होतं असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गौरवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ अपलोड केला आहे. 'तुनिशा तू नेहमी स्मरणात राहशील तू एक खूप छान मुलगी होतीस' असे कॅप्शन त्याने दिले आहे. 



यावर आता युझर्स कमेंट करत दोघांमध्ये नक्की काय नातं होतं, या मुलाला नक्कीच काहीतरी माहित असेल असा संशय आता गौरव वरही घेतला जातोय. तसेच त्याने काही महिन्यांपूर्वी अपलोड केलेल्या एका फोटोतही तुनिशा दिसत आहे. त्यांचं कुटुंब या फोटोत दिसून येतंय. या फोटोवर तुनिशानेच 'फॅमिली' अशी कमेंटही केली आहे. 

तुनिशा शर्माची केस दिवसेंदिवस आणखी गुंतत चालली आहे. शिझान खान सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तुनिशाच्या आई आणि मामाने शिझानवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. शिझान तुनिशाला धोका देत होता असं तिने म्हणलं आहे. त्याचे इतर मुलींसोबत संबंध होते. यामुळेच तुनिशा त्रासात होती. तर दुसरीकडे शिझानच्या परिवाराने तुनिशाच्या आईवर आरोप करत अनेक खुलासे केले आहेत. पोलिस दोन्ही बाजूंनी तपास करत आहेत. 

Web Title: tunisha-sharma-was-with-some-other-guy-who-is-that-mystry-man-find-out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.