तुनिषा आत्महत्या प्रकरण; 70 दिवसानंतर शीझान खान तुरुंगातून बाहेर, कुटुंबीय भावूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 16:37 IST2023-03-05T16:35:57+5:302023-03-05T16:37:13+5:30
तुनिषा शर्माला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप अभिनेता शीझान खानवर आहे.

तुनिषा आत्महत्या प्रकरण; 70 दिवसानंतर शीझान खान तुरुंगातून बाहेर, कुटुंबीय भावूक
Tunisha Suicide Case : तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी अभिनेता शीझान खान गेल्या 2 महिन्यांपासून तुरुंगात होता. तुनिशाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. आता अखेर शीझानला शनिवारी जामीन मिळाला. आज (5 फेब्रुवारी) त्याची तुरुंगातून सुटका करण्यात आली. शीझान खान तुरुंगातून बाहेर पडला जेथे त्याचे कुटुंबीय त्याच्या स्वागतासाठी उपस्थित होते. यावेळी आई आणि त्याच्या दोन बहिणींनी त्याला मिठी मारली. यावेळी शीझानचे कुटुंबीय भावूक झाले.
मीडियापासून अंतर
शीझान 70 दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर आला आहे. बाहेर आल्यानंतर मीडियाने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्याने मीडियाशी बोलणे टाळले. न्यूज एजन्सी एएनआयने तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शीजान खानचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यासोबतच, 'तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणातील आरोपी अभिनेता शीझान खानची ठाणे मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सुटका,' असे कॅप्शनही दिले.
Maharashtra | Television actor Sheezan Khan accused in television actress Tunisha Sharma's suicide case released on bail from Thane Central Jail today pic.twitter.com/KWRSwIYNtD
— ANI (@ANI) March 5, 2023
पासपोर्ट सबमिशन ऑर्डर
गेल्या शनिवारी मुंबईतील वसई न्यायालयाने शीझान खानला जामीन मंजूर केला होता. न्यायाधीश आर.डी. देशपांडे यांनी एक लाख रुपयांच्या जामिनावर शीझानची सुटका करण्याचे आदेश दिले. कोर्टाने अभिनेत्याला त्याचा पासपोर्ट जप्त करण्यास आणि न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडू नये असेही सांगितले.
काय प्रकरण आहे?
गेल्या वर्षी 24 डिसेंबर 2022 रोजी टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने अली बाबा मालिकेच्या सेटवर गळफास लावून आत्महत्या केली होती. तुनिषाच्या आईने 28 वर्षीय शीझान खानविरोधात तक्रार दाखल केली. त्याच्याविरोधात तुनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. तेव्हापासून तो तुरुंगातच होता.