स्वाभिमान मालिकेला मिळणार एक वळण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2017 09:06 AM2017-03-06T09:06:11+5:302017-03-06T14:36:11+5:30

लग्न की करियर हा प्रश्न प्रत्येक तरुण मुलगी आपल्या पालकांना विचारत असते. केवळ मुलींनाच नाही तर त्यांच्या पालकांनादेखील हा ...

A turn for self respecting series | स्वाभिमान मालिकेला मिळणार एक वळण

स्वाभिमान मालिकेला मिळणार एक वळण

googlenewsNext
्न की करियर हा प्रश्न प्रत्येक तरुण मुलगी आपल्या पालकांना विचारत असते. केवळ मुलींनाच नाही तर त्यांच्या पालकांनादेखील हा प्रश्न सतावत असतो. पण अद्याप कोणालाही यावर योग्य उत्तर मिळालेले नाही. याच गोष्टीवर स्वाभिमान या मालिकेत प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. 
स्वाभिमान ही मालिका शारदा आणि तिच्या मुली मेघना आणि नैना यांच्या आयुष्यावर आधारित आहे. आजच्या मुली घर आणि काम या दोन्ही गोष्टी चांगल्याप्रकारे सांभाळू शकतात असे शारदाचे म्हणणे आहे. त्यामुळे आपल्या उच्च शिक्षित मुलींसाठी चांगल्या पतीच्या आणि कुटुंबाच्या शोधात शारदा आहे. आपल्या मुलींसाठी मुलगा पाहात असताना तिची चौहान कुटुंबाशी ओळख होते आणि चौहान कुटुंबातील कुणालची ती आपल्या मोठ्या मुलीसाठी निवड करते. कुणाल आणि त्याचे कुटुंब आपल्या मेघनासाठी योग्य असल्याचे तिचे मत पटते. पण लग्नाच्या दिवशी तिला एक धक्का बसतो. लग्नात एक वेगळीच मागणी चौहान कुटुंबाकडून केली जाते. कुणालचे वडील नंदकिशोर ऊर्फ एनके शारदाला तिची लहान मुलगी नैनाचे त्यांच्या लहान मुलासोबत म्हणजेच करणसोबत लग्न लावण्यास बळजुबरी करतात. असे न केल्यास मेघनाचे लग्न मोडण्याची तिला धमकी देतात. मेघनाचे लग्न मोडू नये यासाठी नैनाचे लग्न करणसोबत लावून दिले जाते. पण या सगळ्या गोष्टी करून एनकेने आईचा अपमान केला असल्याचे मेघनाला वाटते आणि त्यामुळे एनके आणि त्याच्या कुटुंबाकडून मेघना बदला घेण्याचे ठरवते. पण दुसरीकडे आपल्या आईने आपल्याला दिलेल्या संस्कारांचा विचार करून चौहान कुटुंबाला काहीही त्रास न देण्याचे नैना ठरवते. 
आपल्या मुलींना लग्नानंतरही काम करायला द्यावे, त्यांच्या अस्तित्वाचा आदर केला जावा असे कुटुंब आपल्या मुलींना मिळावे ही शारदाची नेहमीची इच्छा असते. पण चौहोन कुटुंबात तिच्या मुलींचे लग्न झाल्यावर तिची ही इच्छा अपूर्णच राहाते. मेघना आणि नैना यांना चौहान कुटुंबात एखाद्या कळसूत्रीच्या बाहुल्यांप्रमाणे वागवले जाते. या सगळ्यामागे संध्या आहे असे मेघनाला कळल्यानंतर ती संध्याला सगळ्या गोष्टींवर सडेतोड उत्तर देण्याचे ठरवते. संध्याला एक पार्टी आयोजित करायची असते. त्यासाठी ती खूप उत्सुक असते. पण ती पार्टी मेघनाच आयोजित करते. या पार्टीला एनके शारदालादेखील बोलावतो आणि तिला तिथे खूप चांगल्याप्रकारे वागवतो. एनकेच्या अशा वागण्यामुळे शारदा आणि तिच्या दोन्ही मुलींना आश्चर्याचा धक्का बसतो. एनके अचानक कसा बदलला हा प्रश्न त्या तिघींनादेखील पडतो. चौहान आणि शारदा यांच्यातील एका चांगल्या नात्याची ही सुरुवात आहे की या सगळ्यामागचा एनकेचा उद्देश काही वेगळा आहे की तो काही वेगळी खेळी खेळत आहे हे जाणून घेण्यासाठी पाहात राहा कलर्स वाहिनीवर सोमवार ते शुक्रवार, रात्री साडे नऊ वाजता स्वाभिमान ही मालिका .


Web Title: A turn for self respecting series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.