एक दीवाना था या मालिकेला मिळणार हे वळण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 11:23 AM2017-12-18T11:23:04+5:302017-12-18T16:53:04+5:30
एक दीवाना था ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा ...
ए दीवाना था ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. या मालिकेच्या कथानकाला देखील प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. एक दीवाना था या मालिकेला सध्या अनेक वळणं मिळत असून या मालिकेतील रहस्यमय थ्रिलर प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. येत्या भागात सौंदर्यवती शरण्या म्हणजेच डॉनल बिष्ट एका सुंदर वधूच्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
एक दीवानाथा मध्ये शरण्या आणि व्योमला एकमेकांपासून दूर ठेवण्याचे शिवचे अनेक प्रयत्न फसल्यानंतर आता शरण्या आणि व्योम यांचा थाटामाटात विवाह होणार आहे.
शरण्या आणि व्योम यांच्या उत्साहाला आता उधाण आलेले आहे. लग्नाची तयारी सध्या जोरदार सुरू आहे. या लग्नात शरण्या एक खूप महागडा लेहंगा घालताना दिसणार आहे. या लहेंगाचे वजन जवळजवळ ४० किलो आहे. शरण्याच्या वधूच्या लुकसाठी क्रिएटिव्ह टीम आणि डिझाइनर्स यांनी अनेक दिवस एकत्र काम केले आहे. त्यांनी तिला या खास भागासाठी उत्कृष्ट आभूषणे आणि खास लेहंगा बनवून दिला आहे. यातून तिला अद्ययावत लुक देण्याचा प्रयत्न मालिकेच्या टीमने केला आहे. मालिकेत आता शरण्या आणि व्योमचे स्वप्न पूर्ण होणार आहे. ते दोघे सप्तपदी घेत एकमेकांना सात जन्म एकत्र राहाण्याचे वचन देणार आहेत. पण दुसरीकडे शिवने त्यांचे लग्न तोडण्याची शपथ घेतली आहे आणि त्यांची स्वप्ने उधळून लावण्यासाठी टोकाची भूमिका घेण्याचा निर्धार केला आहे. पण शरण्याने व्योमशी विवाह करण्याचा पक्का निर्धार केलेला आहे. लग्न सुरळीत व्हावे यासाठी ती एक उपाय शोधून काढणार आहे. ती मंत्र पठणासाठी ब्राह्मणांऐवजी मांत्रिकांना बोलवणार आहे. त्यामुळे सप्तपदीच्या वेळी शिवचा आत्मा व्योमच्या शरीरातून निघून जाईल असे तिला वाटत आहे. पण या मंत्रांचा शिववर काही परिणाम होईल का? व्योमचा जीव वाचविण्याचा आणि शिवला शरण आणण्याचा निर्धार करणार्या शरण्याला अखेरीस व्योम ऐवजी शिवशीच लग्न करावे लागणार का? की तिच्या आयुष्याला कलाटणी मिळून शिव आणि व्योम या दोघांशी विवाह होऊन ती आणखीनच संकटात सापडणार? या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना आगामी भागात या मालिकेत मिळणार आहेत.
या मालिकेत नमिक पॉल शिवची भूमिका साकारत असून व्योमच्या भूमिकेत प्रेक्षकांना विक्रम सिंह चौहानला पाहायला मिळत आहे.
Also Read : एक दीवाना था फेम डॉनल बिष्टच्या लेहंगाचे वजन ऐकून तुम्हालाही देखील बसेल आश्चर्याचा धक्का