तुझेच मी गीत गात आहे: आईचं छत्र हरपलेल्या स्वराचे होतायेत हाल; मुलाच्या रुपात राहून घेणार बाबांचा शोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 18:17 IST2022-06-15T18:17:05+5:302022-06-15T18:17:44+5:30
Tuzech me geet gaat aahe: वडिलांचा शोध घ्यायचा असेल तर स्वराला स्वराज व्हावं लागेल असं तिचं मामा तिला ठणकावून सांगतो.

तुझेच मी गीत गात आहे: आईचं छत्र हरपलेल्या स्वराचे होतायेत हाल; मुलाच्या रुपात राहून घेणार बाबांचा शोध
काही दिवसांपूर्वीच छोट्या पडद्यावर 'तुझेच मी गीत गात आहे' ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या मालिकेत अभिनेता अभिजीत खांडकेकर (abhijeet khandkekar) आणि उर्मिला कोठारे (urmila kothare) मुख्य भूमिका साकारत आहेत. सध्या या मालिकेत एक मोठा ट्विस्ट आला आहे. वैदेहीचा मृत्यू झाल्यामुळे स्वराचे अतोनात हाल होत आहेत. एकीकडे तिची मामी तिला प्रचंड त्रास देत आहे. तर, दुसरीकडे तिचा मामा तिच्या वडिलांना शोधण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्येच आता स्वराला चक्क मुलाचं रुप धारण करावं लागणार आहे.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये स्वराला आता स्वराज म्हणून वावरावं लागणार आहे. वैदेहीच्या निधनानंतर एकटी पडलेली स्वरा तिच्या वडिलांचा शोध घ्यायला निघाली आहे. यामध्ये तिचा मामा तिची साथ देतो. परंतु, वडिलांचा शोध घ्यायचा असेल तर स्वराला स्वराज व्हावं लागेल असं तिचं मामा तिला ठणकावून सांगतो. तसंच वडील भेटल्यानंतर त्यांना सत्यपरिस्थिती सांगू असंही तिला सांगतो.
दरम्यान, आईचं छत्र हरपलेली स्वरा आता एकाकी पडली आहे. एकीकडे आई नाही तर दुसरीकडे वडील असूनही जवळ नाहीत यामुळे स्वरा एकटी पडली आहे. म्हणूनच, ती आता वडिलांचा शोध घ्यायला निघाली आहे.