Akshaya Deodhar and Hardik Joshi engagement : असा दणक्यात पार पडला राणादा व पाठकबाईंचा साखरपुडा; पाहा,खास व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 10:48 AM2022-05-04T10:48:54+5:302022-05-04T13:00:03+5:30

Akshaya Deodhar and Hardik Joshi engagement : ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतील राणादा आणि पाठकबाई या जोडीनं सगळ्यांनाच वेड लावलं होतं. खऱ्या आयुष्यातही ही जोडी एकत्र यावी, अशी प्रेक्षकांची भरून इच्छा होती. प्रेक्षकांची ही इच्छा अखेर पूर्ण झालीये.

Tuzhat Jeev Rangala fame Akshaya Deodhar and hardik joshi engagement video photos viral | Akshaya Deodhar and Hardik Joshi engagement : असा दणक्यात पार पडला राणादा व पाठकबाईंचा साखरपुडा; पाहा,खास व्हिडीओ

Akshaya Deodhar and Hardik Joshi engagement : असा दणक्यात पार पडला राणादा व पाठकबाईंचा साखरपुडा; पाहा,खास व्हिडीओ

googlenewsNext

Akshaya Deodhar and Hardik Joshi engagement : ‘तुझ्यात जीव रंगला’ (Tuzhat Jeev Rangala ) या लोकप्रिय मालिकेतील राणादा आणि पाठकबाई या जोडीनं सगळ्यांनाच वेड लावलं होतं. खऱ्या आयुष्यातही ही जोडी एकत्र यावी, अशी प्रेक्षकांची भरून इच्छा होती. प्रेक्षकांची ही इच्छा अखेर पूर्ण झालीये. होय, राणादा व पाठकबाई आता खऱ्या आयुष्यात पती-पत्नी बनणार आहेत. मालिकेत राणादाची भूमिका अभिनेता हार्दिक जोशीनं (Hardik Joshi) साकारली होती तर पाठकबाईची भूमिका अभिनेत्री अक्षया देवधरनं (Akshaya Deodhar) निभावली होती. काल हार्दिक व अक्षया यांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर दोघांचाही साखरपुडा पार पडला.  या साखरपुड्याचे फोटो तुम्ही पाहिले असतीलच. आता याचे व्हिडीओही समोर आले आहेत.

अक्षया व हार्दिक यांच्या साखरपुड्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. खुद्द अक्षया व हार्दिक यांनीही काही व्हिडीओ शेअर केले आहेत.

हा साखरपुडा अतिशय थाटामाटात पार पडला. हार्दिकने शेअर केलेल्या या व्हिडीओत तो अक्षयला प्रपोज करत अंगठी घालताना दिसत आहे. तर दुसरीकडे अक्षया गाणी गात त्याला अंगठी घालत आहे. त्यानंतर ते दोघेही एकमेकांना मिठी मारत फोटोसाठी पोज देताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

यावेळी अक्षया व हार्दिक यांच्या कुटुंबीय आणि मित्रपरिवाराने त्यांना एक खास सरप्राईजही दिलं. एक झक्कास डान्स परफॉर्मन्स देऊन त्यांनी झक्कास सेलिब्रेशन केलं.


 
 साखरपुड्यावेळी अक्षयाने पिच रंगाची साडी आणि गुलाबी रंगाचा ब्लाउज परिधान केला होता. तर हार्दिकने पिच रंगाचा कुर्ता आणि त्यावर गुलाबी रंगाचे जॅकेट घातले होते.

तूर्तास या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. मात्र याबद्दल त्या दोघांनी मौन बाळगलं होतं.  

Web Title: Tuzhat Jeev Rangala fame Akshaya Deodhar and hardik joshi engagement video photos viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.