Shocking ! लग्नाआधीच राणादा आणि पाठकबाईंचा भर रस्त्यात राडा, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 11:31 AM2022-07-14T11:31:21+5:302022-07-14T11:36:53+5:30
लंडनमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत असलेल्या हार्दिक जोशी आणि अक्षयामध्ये काहीतरी बिनसलं आहे. दोघांचं भर रस्त्यात भांडण झालं आहे.
Akshaya Deodhar, Hardeek Joshi : ‘तुझ्यात जीव रंगला’ (Tujhyat Jeev Rangala) या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेले राणादा आणि पाठक बाई अर्थात हार्दिक जोशी (Hardeek Joshi) व अक्षया देवधर (Akshaya Deodhar) यांची बातच न्यारी. पडद्यावरची ही जोडी खऱ्या आयुष्यातही एकत्र यावी, अशी चाहत्यांची भरून इच्छा होती. चाहत्यांची ही इच्छा अखेर पूर्ण झाली. अक्षया व हार्दिकने अचानक साखरपुडा करत, चाहत्यांना सुखद धक्का दिला. साखरपुडा झाल्यानंतर हे जोडपं सतत चर्चेत आहे. कधी एकमेकांसोबतच्या रोमॅन्टिक व्हिडीओमुळे तर कधी फोटोंमुळे. सध्या काय तर हे कपल लंडनमध्ये एकमेकांसोबत सुट्टी एन्जॉय करत आहे. मात्र लंडनमध्ये दोघांमध्ये काही तरी बिनसलं आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. यात लंडनमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत असलेल्या हार्दिक जोशी आणि अक्षयामध्ये भांडण झालं आहे. यावरून अक्षयाने थेट हार्दिकची कॉलर पकडली आहे. अभिनेता नितेश चव्हाणने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.
नितेशसुद्धा या विनोदी व्हिडीओचा भाग झाला होता. भाई, तांब्याला घासून कधी सोनं नाही होत, असे हार्दिक नितीशला सांगतोय. यावर तू असा बोलतास असा प्रश्न नितीश हार्दिकला विचारतो. यावर राणादा म्हणतो, माझी बायको पार्लरमध्ये गेलीय. असं म्हणत असताना मागे पाठकबाईंची एंट्री होते आणि त्या हार्दिकचा चांगला समाचार घेतात. लग्नाआधीच अक्षयाने हार्दिकला चांगलंच धाकात ठेवलं आहे. दोघांचा हा विनोदी व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला आहे. अंजलीबाई हानल दोगाणं पण, लय हसलो य राव, लय भारी राव अशा कमेंट्स या व्हिडिओवर येतायेत.
झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील अंजली बाई आणि राणादा या ऑनस्क्रीन जोडीला खूप लोकप्रियता मिळाली होती. ही ऑनस्क्रीन जोडी आता आयुष्यभरासाठी एकमेकांसोबत एंगेज झाली आहे. अक्षया आणि हार्दिक लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. पुण्यात त्याचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. नुकतंच दोघांनी ‘चला हवा येऊ द्या’मध्ये हजेरी लावली होती. तेव्हा लग्न कधी आणि कुठे करणार असा प्रश्न विचारल्यानंतर दोघेही पुण्यात लग्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. लग्नाची तारीख मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.