तुझ्यात जीव रंगलामधील लाडूला येते हे देखील काम, व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील बसेल आश्चर्याचा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 02:06 PM2019-05-01T14:06:00+5:302019-05-01T14:10:02+5:30
लाडू खऱ्या आयुष्यात कसा आहे. त्याला काय काय आवडते हे जाणून घ्यायला त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडतं. नुकताच लाडूचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राजवीर म्हणजे लाडू याचं खरं नाव राजवीरसिंह रणजीत गायकवाड आहे. या मालिकेमुळे लाडूला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. लाडू खऱ्या आयुष्यात कसा आहे. त्याला काय काय आवडते हे जाणून घ्यायला त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडतं. नुकताच लाडूचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत चक्क लाडू म्हणजेच राजवीरसिंह आपल्याला पारंपरिक पद्धतीने ऊसाचा रस काढताना दिसत आहे. राजवीरसिंहचा हा व्हिडिओ पाहून त्याचे चाहते अवाक झाले आहेत. या छोट्याशा लाडूचे अभिनयासाठी नेहमीच कौतुक केले जाते. पण त्याचसोबत या चिमुकल्या लाडूला ऊसाचा रस काढण्यासारखे कठीण काम देखील येते हे पाहून त्याचे चाहते चांगलेच खुश झाले आहेत.
लाडू हा सध्या मोतीबाग तालीम येथून कुस्तीचे धडे घेत आहे तर कोल्हापुरातील ‘लिट्ल वंडर स्कूल’ मध्ये तो शिकत आहे. शाळेतही तो तितकाच हुशार आहे. त्याला फुटबॉल, चेस, बैडमिंटन या खेळांची आवड आहे. “लाठी-काठी” ह्या शिवकालीन खेळाचाही तो सध्या सराव करतोय. काही दिवसांपूर्वी तो लाठी-काठी चा सराव करताना डेन्मार्क येथून काही मंडळी डॉक्युमेंटरी करण्यासाठी आले होते आणि ते आपल्या लाडूचे काही फोटो आणि क्लिप्स घेऊन गेले. लवकरच ही लाठी-काठीची डॉक्युमेंटरी प्रसिद्ध होणार आहे.
राजवीरसिंहचा जन्म २२ ऑक्टोबर २०१३ साली सांगली येथे झाला असून आता तो आता साडे चार वर्षांचा आहे. राजवीरसिंहचे वडील रणजीत गायकवाड हे प्रसिद्ध लिफ्टिंग चॅम्पियन आहेत. वेट लिफ्टिंग मध्ये त्यांनी सलग ५२ राज्यस्तरीय आणि १० राष्ट्रीय तसेच अनेक इंटरनॅशनल स्पर्धा खेळल्या आहेत. त्यात त्यांना अनेकदा गोल्ड मेडल देखील मिळाले आहे. त्यानंतर भारतीय सेनेत त्यांनी मानाची नोकरी पत्करली तर आई पल्लवी रणजित गायकवाड या एम. कॉम आणि एम. बी. ए. इन फायनान्स मधून पदवीधर आहेत. काही काळ त्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत अकाऊंटण्ट ही होत्या. पण सध्या राजवीरसिंहच्या उज्ज्वल भविष्यासाठी कोल्हापूर येथे स्थायिक झाल्या आहेत.