'तुझ्यात जीव रंगला'मधील वहिनीसाहेब सध्या आहेत ईशान्य भारताच्या दौऱ्यावर, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 06:56 PM2019-05-31T18:56:16+5:302019-05-31T18:57:07+5:30

सध्या धनश्री व्हॅकेशनवर असून ती ईशान्य भारतात सुट्टी एन्जॉय करते आहे.

Tuzyat Jeev Rangala's Vahinisaheb on Nort east India vacation mode, see photo | 'तुझ्यात जीव रंगला'मधील वहिनीसाहेब सध्या आहेत ईशान्य भारताच्या दौऱ्यावर, पहा तिचे फोटो

'तुझ्यात जीव रंगला'मधील वहिनीसाहेब सध्या आहेत ईशान्य भारताच्या दौऱ्यावर, पहा तिचे फोटो

googlenewsNext


झी मराठी वरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत पाठकबाईंना धडा शिकवण्यासाठी सतत डोकं लावत असणारी नंदिता वहिनी म्हणजे अभिनेत्री धनश्री काडगांवकरला या मालिकेमुळे चांगली लोकप्रियता मिळाल्याचे पाहायाला मिळतंय. मालिकेत तिच्या अभिनयासह तिच्या सौदर्यांनेही रसिकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेतील राणादा आणि पाठकबाईंची जोडी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य तर करतेच आहे पण त्यापाठोपाठ धनश्रीही म्हणजेच नंदिता वहिनीदेखील सा-यांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरली. सध्या धनश्री व्हॅकेशनवर असून ती ईशान्य भारतात सुट्टी एन्जॉय करते आहे. तिने या ठिकाणचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

धनश्री काडगांवकर हिने इंस्टाग्रामवर अरूणाचल प्रदेश व मेघालय येथील फोटो शेअर केले आहेत. त्यासोबत तिने एका फोटोत मेघालयातील निसर्गाचे सुंदर फोटो शेअर करीत बालपणीच्या आठवणींना उजाळादेखील दिला आहे. तिने म्हटलं की, लहानपणी आपण सगळेच एक चित्र काढायचो. मागे अनेक डोंगर, उगवता किंवा मावळलेला सूर्य, खूप सारे ढग. त्या डोंगराच्या मधून जाणारी एक सुंदर नदी.. आणि एखादे टुमदार घर. मधल्या काही काळात वाटून जातं, किती काल्पनिक आणि फॉरमॅटेड चित्र आहे हे. सगळे असच चित्रे काढतात. बरे आणि प्रत्यक्षात हे असे आहे तरी का... तर हो आहे असं.. हे सगळे प्रत्यक्ष बघितल्यावर त्या लहानपणी काढलेल्या चित्राची खूप आठवण आली. मला वाटते आपल्या पैकी बऱ्याच जणांची ही आठवण ताजी झाली असेल.. 


तिने पुढे म्हटले की, तेव्हाचे हे चित्र किती अर्थपूर्ण होते हे आता कळते.  हे मोठे मोठे डोंगर आपल्याला ताठ मानेने जगायला शिकवतात. नद्या प्रवाहाबरोबर जाणे शिकवतात. एका पाठोपाठ असणारी अनेक झाडे आपल्याला एकी शिकवून जातात. लांब आणि खडकाळ रस्ते, लढण्याची वृत्ती शिकवून जातात..


सुसाट वारा थोडं घाबरवतो, त्यात पाऊस आला तर आता पुढे काय याची धाकधूक वाटते, पण मधूनच हे धुकं बाजूला सारून अरुणाचल प्रेदेशातला अरुण(सूर्य) आपलं डोकं वर काढतो आणि दिलासा मिळतो.. असा हा निसर्ग. याला जपले तर तो मदतीला येईल नाहीतर अणू रेणू इतकी जागा पण नसेल आपली. 

धनश्रीने सोशल मीडियावर शेअर केलेले निसर्गरम्य फोटो पाहून तुम्ही देखील प्रसन्न झाला असाल ना.

Web Title: Tuzyat Jeev Rangala's Vahinisaheb on Nort east India vacation mode, see photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.