एकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 03:09 PM2019-07-22T15:09:31+5:302019-07-22T15:10:17+5:30

छोट्या पडद्यावरील या अभिनेत्याने कॉमेडी सीरिज 'धूम मचाले धूम'मधून पदार्पण केले होते.

Tv Actor Jay Bhanushali Share When He Was Waorking As Salesman | एकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार

एकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार

googlenewsNext


छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता जय भानुशालीने घराघरात आपली ओळख बनवली आहे. जयने त्याच्या करियरची सुरूवात टेलिव्हिजनवरील कॉमेडी सीरिज 'धूम मचाले धूम'मधून केली. २००७ साली एकता कपूरची मालिका 'कयामत'मध्ये काम मिळालं आणि या मालिकेतून तो प्रसिद्ध झाला होता. फार कमी लोकांना माहित आहे की, जय अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी सेल्समॅन होता. 

जय भानुशालीने सांगितलं की, 'माझे वडील बँक मॅनेजर होते आणि नेहमीच सांगायचे की, तुम्हाला माहित असलं पाहिजे की, पैसे कमवणं एवढं सोप्पे नाही. मला व माझ्या भावाला दहावी इयत्तेनंतर पार्ट टाईम जॉब करण्यासाठी सांगितलं होतं.'


जय भानुशाली हिने सांगितलं की, 'मी वडिलांनी सांगितल्याप्रमाणं केलं. मी पुस्तकं विकली आणि काही शूज ब्रॅण्डसाठी सेल्ममॅनचं देखील काम केलं. मात्र मला हे काम अजिबात आवडलं नाही. मला लोक सांगायचे की अभिनयात ट्राय करून हिरो बन. ही गोष्ट मी सीरियसली घेतलं. '


जयला त्याच्या भूतकाळाची अजिबात लाज वाटत नाही उलट तो या अनुभवाला शिकवण मानतो. ही शिकवण त्याला जमिनीवर रहायला शिकवते. सध्या जयची पत्नी व टीव्ही अभिनेत्री माही विज प्रेग्नेंट आहे.


जय आणि माही शेवटचं एकत्र 'किचन चॅम्पियन'च्या ५ व्या सीझनमध्ये एकत्र झळकले होते. माहीने 'बालिका वधू' मालिकेत नंदिनीची भूमिका साकारली होती.

तसेच तिने नकुशाची साकारलेली भूमिका प्रेक्षकांना खूप भावली होती. या मालिकेचं नाव 'लागी तुझसे लगन है' असं आहे. तर जयने कित्येक टीव्ही शोजचं सूत्रसंचालन केलं आहे.

Web Title: Tv Actor Jay Bhanushali Share When He Was Waorking As Salesman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.