भारीच! टीव्ही अभिनेत्याने व्यवसायात टाकलं पाऊल, दुबईत सुरू केलं स्वत:चं रेस्टॉरंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 13:19 IST2024-12-13T13:18:48+5:302024-12-13T13:19:55+5:30

एका टीव्ही कलाकाराने व्यवसायात पाऊल ठेवलं आहे. टीव्हीवरील या लोकप्रिय कलाकाराने दुबईत त्याचं स्वत:चं रेस्टॉरंट सुरू केलं आहे.

tv actor karan wahi started his new business open restaurant in dubai | भारीच! टीव्ही अभिनेत्याने व्यवसायात टाकलं पाऊल, दुबईत सुरू केलं स्वत:चं रेस्टॉरंट

भारीच! टीव्ही अभिनेत्याने व्यवसायात टाकलं पाऊल, दुबईत सुरू केलं स्वत:चं रेस्टॉरंट

अभिनय क्षेत्रात काम करण्याबरोबरच कलाकार दुसऱ्या क्षेत्रातही कार्यरत असतात. अनेक कलाकारंचे त्यांचे स्वत:चे बिजनेसही आहेत. आता अशाच एका टीव्ही कलाकाराने व्यवसायात पाऊल ठेवलं आहे. टीव्हीवरील या लोकप्रिय कलाकाराने दुबईत त्याचं स्वत:चं रेस्टॉरंट सुरू केलं आहे. हा अभिनेता म्हणजे करण वाही आहे. 

करणने दुबईत त्याचं स्वत:चं रेस्टॉरंट सुरू करत व्यवसायात पहिलं पाऊल टाकलं आहे. करणने स्ले बार अँड किचन हे रेस्टॉरंट दुबईत सुरू केलं आहे. नुकतंच या रेस्टॉरंटचं ओपनिंग करण्यात आलं. "आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा तो शेअर केला जातो. माझ्या जवळच्या माणसांबरोबर मला हे शेअर करता आलं याचा आनंद आहे", असं कॅप्शन देत करणने नवीन रेस्टॉरंटचे फोटो शेअर केले आहे. अनेक कलाकारांनीही करणच्या दुबईतील या नव्या रेस्टॉरंटच्या ओपनिंगला हजेरी लावली होती. त्याच्या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 


करणने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'दिल मिल गए' या मालिकेमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. त्याने 'बात हमारी पक्की है', 'कुछ तो लोग कहेंगे', 'मेरे घर आई एक नन्ही परी', 'कसम से', 'श्रद्धा' अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. 'जग्गा जासूस', ;हेट स्टोरी ४' या सिनेमांमध्येही तो झळकला आहे. काही कॉमेडी शो आणि रिएलिटी शोमध्येही करण दिसला होता.

Web Title: tv actor karan wahi started his new business open restaurant in dubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.