करणवीर मेहराचा लग्नानंतर २ वर्षातच घटस्फोट, ५ वर्षांपूर्वी पहिल्या पत्नीसोबतही मोडला होता संसार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 11:49 AM2023-10-24T11:49:58+5:302023-10-24T11:52:03+5:30
पत्नी निधी सेठने सांगितलं घटस्फोटाचं कारण, म्हणाली,...
मनोरंजनसृष्टीत प्रसिद्ध जोडप्यांचे घटस्फोट होणं काही नवीन नाही. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता करणवीर मेहरा (Karanveer Mehra) आणि निधी सेठ (Nidhi Seth) यांच्याही वाटा वेगळ्या झाल्या असल्याचं कळतंय. 'पवित्र रिश्ता' फेम करणवीर मेहरा आणि निधी सेठ अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. त्यांची जोडी खूपच चर्चेत असायची. जानेवारी २०२१ मध्ये ते लग्नबंधनातही अडकले. मात्र लग्नानंतर दोनच वर्षात त्यांनी घटस्फोट घेतला असल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटलं आहे.
अभिनेता करणवीर मेहरा सध्या 'बाते कुछ अनकही सी' मालिकेच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. तर निधी सेठ तिच्या आईवडिलांकडे बंगळुरुला राहायला गेली आहे. घटस्फोटाची बातमी स्वत: निधीने माध्यमांना दिली आहे. रिपोर्टनुसार, निधी म्हणाली,'आमचा तीन महिन्यांपूर्वी घटस्फोट झाला. तर एक वर्षापूर्वीच आम्ही वेगळे झालो होतो. मला वाटतं कोणत्याही नात्यात रोज भांडणं होत असतील तर एक दिवस ते सहनशीलतेच्या पलीकडे जातं. अशावेळी एकत्र राहणं शक्य होत नाही. मानसिक शांतता आणि एकमेकांसाठी आदर, प्रामाणिकपणा आणि आर्थिक सक्षमता हे संसारात खूप गरजेचं आहे.'
ती पुढे म्हणाली,'कोणत्याही नात्यात येताना अनेक गोष्टींचा नीट विचार केला पाहिजे. दु:खाची गोष्ट ही की आजही आपल्याला लोकांचा स्वभाव आणि माणसांबद्दल त्या पद्धतीची माहिती नसते ज्यामुळे नातं खराब होईल.'\
करणवीर मेहराचा हा दुसरा घटस्फोट आहे. याआधी 2009 मध्ये त्याने लहानपणीची मैत्रिण देविकासोबत लग्न केले होते. तर ९ वर्षांनी 2018 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. तर निधी सेठने 'मेरे डॅड की दुल्हन','किस्मत का खेल' आणि 'श्रीमद भागवत महापुराण'मध्ये काम केले आहे. मात्र सध्या ती कुटुंबासोबत बंगळुरुत आहे. तिने कामातून ब्रेक घेतला असून इंटिरियर डिझायनर या करिअरमध्ये फोकस करण्याचा निर्णय घेतला आहे. मला बंगळुरु खूप आवडतं. जेव्हा मला अभिनयाची संधी मिळेल तेव्हा मी पुन्हा मुंबईत येईन.