टीव्ही अभिनेता शाहीर शेख दुसऱ्यांदा झाला बाबा, पत्नीने शेअर केली लेकीची झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 16:13 IST2024-01-01T16:13:09+5:302024-01-01T16:13:39+5:30
त्याच्या घरी पुन्हा गोंडस चिमुकलीचं आगमन झालं आहे.

टीव्ही अभिनेता शाहीर शेख दुसऱ्यांदा झाला बाबा, पत्नीने शेअर केली लेकीची झलक
'महाभारत','कुछ रंग प्यार के ऐसे भी'सह अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा टीव्ही स्टार शाहीर शेख (Shaheer Sheikh) दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. २०२० मध्ये त्याने रुचिका कपूरसोबत (Ruchika Kapoor) लग्नगाठ बांधली. तर २०२१ मध्ये त्यांना मुलगी झाली. पहिल्या लेकीच्या जन्मानंतर दोन वर्षात शाहीर दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्याच्या घरी पुन्हा गोंडस चिमुकलीचं आगमन झालं आहे.
39 वर्षीय अभिनेता शाहीर शेखची पत्नी रुचिका कपूरने सोशल मीडियावर दोन्ही मुलींची झलक शेअर केली आहे. दोघी चिमुकलींची नावंही खूपच खास आहेत. पहिल्या मुलीचं नाव अनाया तर दुसऱ्या लेकीचं नाव कुदरत असं ठेवण्यात आलं आहे. रुचिकाने फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले,'बहीण बाजूला असण्याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे...खरं तर काहीच नाही. तुलना होऊच शकत नाही. अनन्या आणि कुदरत.'
शाहीर आणि रुचिकावर सध्या सगळेच अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. रुचिका कपूर दुसऱ्यांदा गरोदर असल्याची खबर कोणालाच नव्हती. तर शाहीरने आजपर्यंत त्याच्या पहिल्या लेकीचा चेहराही दाखवलेला नाही. शाहीरचे नातेवाईक अलीफा शेख यांनी बातमीला दुजोरा देत ही मुलगी शाहीरचीच आहे हे कन्फर्म केले. रुचिका स्वत: फिल्म इंडस्ट्रीत काम करते. लेकीच्या जन्मानंतर पुन्हा कामावर परतल्यानंतरचा अनुभव तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.