टीव्ही अभिनेत्याची कॅन्सरशी झुंज, कलाकारांनी सोशल मीडियातून केली आर्थिक मदतीची विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 12:27 PM2023-02-07T12:27:24+5:302023-02-07T12:28:32+5:30
टीव्ही सिरिअल 'निशा और उसके कजिन्स' फेम अभिनेता वैभव राघवे कॅन्सरशी झुंज देत आहे.
टीव्ही सिरिअल 'निशा और उसके कजिन्स' फेम अभिनेता वैभव राघवे कॅन्सरशी झुंज देत आहे. गेल्या वर्षीच त्याला फोर्थ स्टेज कोलन कॅन्सरचे निदान झाले. तेव्हापासून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र आता खर्च परवडत नसल्याने त्याच्या कुटुंबियांनी मदतीची याचना केली आहे. दरम्यान सौम्या टंडन, करणवीर बोहरा, आदिती मलिक आणि मोहसीन खान या टीव्ही कलाकारांनी पुढे येत आर्थिक मदत केली आहे.
सौम्या टंडनने वैभवसाठी मागितली मदत
'भाभी जी घर पर है' फेम सौम्या टंडनने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत काही फोटो पोस्ट केले आहेत. मेरे प्यारे दोस्त वैभव राघवे ज्याला आम्ही प्रेमाने विभु म्हणतो सध्या कॅन्सरशी झुंज देत आहे. टाटा मेमोरियल रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. तो आमच्या सर्वांच्या आयुष्यात सूर्याच्या किरणासारखा आहे, नेहमी सकारात्मक राहणारा आणि हेल्थ कॉन्शियस. नुकतेच त्याच्या वडिलांचे निधन झाले. देव त्याच्या चांगल्या मुलांचीच नेहमी परिक्षा घेत असतो.'
6 महिन्यांच्या किमोथेरपीनंतर त्याच्यावर दर महिन्याला इम्युनोथेरपी सुरु आहे ज्याच्या प्रत्येक डोस चा खर्च ४ लाख ५० हजार येत आहे. जानेवारी २०२३ मध्येच त्याला इम्युनोथेरपीचा सल्ला दिला होता जो वर्षभर चालणार होता. आणि नंतर सर्जरी करावी लागणार अशीही कल्पना दिली होती. आता त्याला आणखी ४० लाखा रुपयांची गरज आहे. त्याला जगायचे आहे आणि तो या आजाराशी झुंज देत आहे. त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना मदतीची गरज आहे. कृपया शक्य असेल तितकी मदत करा आणि प्रार्थना करा. आपण सर्वच त्याच्यासाठी इतकं करु शकतो. '
'मोहित मलिक' आणि 'आदिती मलिक' या टीव्ही कपलनेही वैभव कुमारसाठी मदत मागितली आहे. तसेच अभिनेता 'करणवीर बोहरा'नेही स्वत: मदत करत सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत आणखी मदतीची विनंती केली आहे.
वैभव कुमारने 'निशा और उसके कजिन्स' या मालिकेत काम केले आहे. तसेच 'सावधान इंडिया' च्या काही एपिसोडमध्येही त्याने काम केले आहे.